शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सुटता सुटेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 5:00 AM

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या अंतर्गत सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करणे, अधिसंख्य शिक्षकांना वेतन वाढ देणे, १५ जुलै २०१४, आक्टोबर २०१४ ला पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा प्रमाणे पदवीधर पदाची वेतन श्रेणी लागू करणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे रिक्त जागा त्वरित भराव्यात, पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, प्राथमिक शिक्षकांकडून रिक्त जागेवर सेवा ज्येष्ठतेनुसार अभावित पद्धतीने केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती द्देण्यात यावी, .......

ठळक मुद्देविविध प्रश्नांवर चर्चा : अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना साकडे 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दशकभरापासून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. अनेकवेळा आश्वासने मिळाली मात्र त्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्यात आला नाही. अशीच बाब समोर ठेऊन अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाच्यावतीने शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  मनोहर बारस्कर यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकारी बारस्कर यांचे स्वागत करून शिक्षकांच्या समस्यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीचे नेतृत्व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांनी केले.प्राथमिक शिक्षकांच्या समस्या अंतर्गत सीएमपी प्रणालीद्वारे वेतन अदा करणे, अधिसंख्य शिक्षकांना वेतन वाढ देणे, १५ जुलै २०१४, आक्टोबर २०१४ ला पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना चंद्रपूर जिल्हा प्रमाणे पदवीधर पदाची वेतन श्रेणी लागू करणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे रिक्त जागा त्वरित भराव्यात, पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, प्राथमिक शिक्षकांकडून रिक्त जागेवर सेवा ज्येष्ठतेनुसार अभावित पद्धतीने केंद्र प्रमुख पदावर पदोन्नती द्देण्यात यावी, पदावनत झालेल्या शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, वैद्यकीय प्रतिपूर्ती मंजूर झालेल्या शिक्षकांची देयके निकाली काढण्यात काढावी, निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या प्रकरणात त्वरित मंजुरी देण्यात यावी, मागील वर्षी निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांची थकबाकी निकाली काढावी,  वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांचे प्रकरणे मंजूर करावी आदी मागण्यांवर शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर यांच्याशी चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने सर्वात प्रथम शिक्षणािधकारी बारस्कर यांच्याशी भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. प्राथमिक शिक्षकांच्या समस्या लक्षात घेता शिक्षणाधिकारी बारस्कर यांनी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, श्रावण लांजेवार, संजय आजबले, विकास गायधने, बाळकृष्ण भुते, अरुण बघेले, यशपाल वाघमारे, अशोक ठाकरे, रषेसकुमार फटे, नेपाल तुरकर, जे.एम. पटोले, रवी उगलमुगले, सुनील निनावे, विजय चाचेरे, सुरेश कोरे, केशव अतकरी, योगेश पुडके, किशोर ईश्वरकर, मंगेश नंदनवार, नरेंद्र रामटेके, आदेश बोंबार्डे, एन.डी. शिवरकर, हरिदास घावडे, लीलाधर वासनिक, विनय धुमणखेडे, संजय झंझाड यासह अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Teacherशिक्षक