राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कोरोना कालावधीतील नियमात शिथिलता दिली आहे. राज्यातील जनजीवन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करीत व्यवसायाला सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे दुकाने सुरू करण्यात आली आहेत. परंतु चांदपूर गावात असणारे पूजासाहित्य विक्रीचे दुकाने लॉकडाऊनपासून बंदच ठेवण्यात आली आहेत. यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गावांत उदरनिर्वाहाचे साधन नाही. गावांत रोजगार नसल्याने अनेक जमलेल्या व्यावसायिकांनी रोजगाराच्या शोधासाठी गाव सोडले आहे. गावांत घरे आहेत पण माणसे नाहीत. असे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या दिशेने उपाययोजना तयार केल्या जात आहे. चांदपुरातील जागृत हनुमान देवस्थान बंद ठेवण्यात आले आहे. या विषयावर त्यांचे प्रतिक्रिया नाहीत. शासनाच्या नियमावर आक्षेप नाहीत. देवस्थान बंद असताना आराध्य दैवताचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. दुरूनच दर्शन घेऊन निघून जात आहेत. लंगडा हनुमान देवस्थानात साकडे घालत आहेत. याच मंदिरात पूजाअर्चना करीत आहेत. या भाविक भक्तांना पूजेचे साहित्य मिळत नाहीत. याशिवाय व्यावसायिकांचे रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. यापूर्वी व्यावसायिकांनी दुकाने सुरू करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्याचे निवेदन दिले आहे. पत्रव्यवहार सुरू केला आहे. या व्यावसायिकांनी देवस्थान सुरू करण्याची मंजुरी मागितली नाही. दुकाने सुरू करण्याचे मंजुरी देणारे निवेदन आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने साधी दखल या गरीब व्यावसायिकांची घेतली नाही. सर्वच दुकाने सुरू झाली असताना चांदपुरातील दुकानदारांवर अन्याय करण्यात येत असल्याचे निवेदन राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना व्यावसायिकांनी दिले. निवेदनातून समस्या मांडल्या. त्यानंतर खा. पटेल यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला आहे. कोरोना नियमांचे पालन करीत चांदपुरातील दुकानदारांना दुकाने सुरू करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. पटेल यांनी देवस्थान परिसरात विविध कामांचा आढावा घेतला असता व्यावसायिकांनी समस्या मांडल्या आहेत. या वेळी माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार राजू कारेमोरे, धनंजय दलाल, माजी सभापती धनेंद्र तुरकर, उमेश तुरकर, कृष्णा बनकर, अनिल बिसने उपस्थित होते.
प्रफुल्ल पटेल यांनी जाणल्या दुकानदारांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:42 AM