लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या साध्वी प्रज्ञासिंहचा येथील पोलीस बॉईज असोसिएसनने तीव्र शब्दात निषेध दर्शविला. यासंबधीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आले.हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादाशी लढताना झालेला नसून मी दिलेल्या शापामुळे त्यांचा सर्वनाश झाला, ते देशद्रोही होते असे आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभर तीव्र्र पडसाद उमटत असताना भंडारा येथील पोलीस बॉईज अशोसिएशनचा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. देशातील शहिद झालेल्या अधिकाऱ्यांबद्दल असे विधान करणे म्हणजे हा शहीद जवानांचा अपमान होय, त्याच्या निषेधार्थ सर्वसामान्य जनतेने एकुण अशा घटनांचा तिव्र निषेधात सहभागी होण्याची गरज असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सांगितले.शिष्टमंडळात पोलीस बाईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जैराम बावने, तालुका महिला उपाध्यक्षा सिंधु मडावी, उपाध्यक्षा ठाकुर, सचिव जया हिंगणे तसेच सर्व सदस्यगण व महाराष्टÑ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष, डी. बी. ईलमकर, उपाध्यक्ष गजानन भोवते, मार्गदर्शक पुंडलीकराव निखाडे, सचिव जयदेव नवखरे, कोषाध्यक्ष धनराज कोचे, सहसचिव नंदकिशोर माहुर्ले, कोषाध्यक्ष धनराज कोचे, संघटक यादवराव गणविर, अरविंद मेश्राम, सदस्य महादेव पटले, लक्ष्मीनारायण दोनोडे, प्रमिला तिरपुडे उपस्थित होते.
पोलीस बॉईजने केला प्रज्ञा सिंहचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:01 AM