लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पुरोगामी विचारवंत, संपादक यांचा बेंगलोर येथेपत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या मारेकºयांना व सूत्रधारांना त्वरीत अटक करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्यावतीने प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाºयांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.सर्वप्रथम संपादक व पुरोगामी विचारवंत गौरी लंकेश यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यापूर्वी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत व समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पाणसरे यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येचा शोध अद्यापही शासनाला लावता आलेला नाही. यानंतरही पुरोगामी विचारवंत डॉ. एम.एम. कलबुर्गी यांचाही खून झाल्यानंतर शासन यंत्रणेला खुन्यांचा शोध घेता आला नाही. शासनाच्या तपास यंत्रणेतील अपयशामुळे मारेकºयांचे बळ वाढले आहे. त्याचीच परिणीती गौरी लंकेश यांच्या हत्येत झाली. या घटनेचा निषेध व या हत्येचे सूत्रधार शोधण्यात यावे यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, प्रा. नरेश आंबिलकर, हर्षल मेश्राम, डॉ. प्रविण थुलकर, कन्हैय्या नागपुरे, चंद्रशेखर भिवगडे, लिलाधर बन्सोड, त्रिवेणी वासनिक, मधुकर येरपुडे, मेघा चौरे, संपादक हिवराज उके, अमीत मेहर, बाया बनकर, बासप्पा फाये, कतिवा लोणारे, पुरूषोत्तम कांमळे, गणेश लिमजे, विलास साकोरे उपस्थित होते.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा अंनिसतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 11:22 PM