भंडारा : वीज वितरण कंपनी, येथील अभियंते, अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कामगार यांची संयुक्त कृषी समिती द्वारा भंडारा प्रविभागीय कार्यालयासमोर शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.संयुक्त कृषी समोरच्या प्रमुख मागण्या महानिर्मितीचे संच बंद करून खाजगी विज खरेदी करणे, वितरण कंपनीचे प्रादेशिक विभाग करण्याचा फेरविचार करणे, तीनही कंपन्यांचे बदली धोरण चर्चा करून ठरविणे, तीनही कंपन्यातील रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणे, तिनही कंपन्याचे स्टॉफ सेटअपं व स्टॉफ नॉमर्स ठरविणे. याद्वार सभेत हरीष डायरे, प्रशांत भोंगाडे, राजेश जांगडे, ए.बी. कुरेशी, पी.डी. पवार यांनी संबोधित केले. द्वारसभेला अजय उमप, मंगेश कहाळे, राजेंद्र नंदनवार, हेमंत आंबेकर, भाकरे, जिचकार, अमोल जैस्वाल, अनंता हेमके, राहुल खंडारे, योगेश ईटनकर, एस.जी. पेठे, डी.डब्ल्यु. केळवदे, ए.आर. गुमडेलवार, जी.जे. चिमणकर, आयएस गोरले, झलके, डी.बी. पेशकार, एस.टी. निखाडे, वडे, शेख, किरणापुरे, आसोले, डी.एस. पंचबुद्धे, पी.जे. देशकर, के.डी. बडवाईक, एम.टी. गायधने, बाळा बोदीले, प्रकाश शिंदे, एन.एस. गाडीमाने, मडावी, प्रमोद इंगळे, नरेश मोहतुरे, महिला प्रतिनिधी अंजली पांडे, सुनिता कळंबे, अस्मिता पाटील, लता नंदनवार, सुरेखा गजभिये, किर्ती बहेकार, प्रिया तामडागडे, शुभांगी इलमे, सुहास माचवे, शेख, शेंदर, दलाल आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
संयुक्त कृती समितीद्वारा द्वारसभा घेऊन शासनाचा निषेध
By admin | Published: August 18, 2016 12:22 AM