राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागात भंडाऱ्यासह गाेंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागातील विविध आगाराच्या अनेक बसफेऱ्या मध्य प्रदेशासाठी सुरू करण्यात आल्या आहे. बालाघाट, वाराशिवनी मार्गावर अनेक बसेस धावतात. मात्र आता या आदेशामुळे भंडारा विभागातील मध्य प्रदेशासाठी असलेली आंतरराज्यीय बससेवा बंद करावी लागणार आहे. शनिवारी वाराशिवनी येथे जाणारी एसटी बस बफेरा येथे मुक्कामी ठेवली हाेती. भंडारा विभागातून सात बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र छत्तीसगढ राज्यातील डाेंगरगढ मार्गावरील बसेस सुरू असल्याचे सांगण्यात आले.
बाॅक्स
नागपूरहून भंडारा येणाऱ्या बससाठी ५० टक्के प्रवासी क्षमता
नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये काेराेना रुग्ण वेगाने वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरहून भंडारा येथे येणाऱ्या सर्व बसेसमध्ये ५० टक्के प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. भंडारा परिवहन विभागाचे यंत्र अभियंता गजानन नागाेलवार यांनी सांगितले की, बसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी प्रवास करेल, असे निर्देश दिले आहे. मात्र जिल्हा अंतर्गत सुरू असलेल्या बसेसच्या प्रवासी संख्येबाबत काेणतेच निर्देश दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
बाॅक्स
छत्तीसगढच्या सीमेवर ॲन्टिजेन चाचणी
महाराष्ट्रातून छत्तीसगढ राज्यात जाणाऱ्या सर्व प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी केली जात आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगढच्या सीमेवर असलेल्या बाघ नदी परिसरात छत्तीसगढ सरकारने चाचणी केंद्र उभारले आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व प्रवाशांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येते. निगेटिव्ह अहवाल आल्यास छत्तीसगढमध्ये प्रवेश दिला जाताे. या ठिकाणी चाचणीसाठी प्रवाशांना एक ते दीड तास ताडकळत राहावे लागत आहे. मात्र काेराेना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही व्यवस्था गरजेची असल्याचे प्रवासी सांगत आहे.