सात एकर जागेचा समावेश : प्रकल्प कार्यालय, सदनिकेचा प्रस्तावलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नाकाडोंगरी वनविभाग कार्यालयासमोर बावनथडी प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय तथा कर्मचाऱ्यांच्या सदनिकेकरिता सुमारे सात ते आठ एकर जमीन खरेदी केली होती. सुरक्षेकरिता तारेचे कुंपन, प्रवेश फाटक, आंतरिक रस्ते तयार केले होते. लाखों रुपये खर्च करण्यात आले. सध्या कुंपन, लोखंडी फाटक चोरीला गेले असून शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याची येथे तयारी सुरु आहे.सुमारे ३५ वर्षापुर्वी बावनथडी प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. नाकाडोंगरी पासून बावनथडी प्रकल्पाचे अंतर १५ किमी आहे. त्यामुळे शासनाने येथे उपविभागीय कार्यालय तथा कर्मचाऱ्यांच्या सदनिका तयार करण्याकरिता सात ते आठ एकर जमिनीची निवड केली. लाखो रुपये खर्च करुन संपूर्ण परिसराला तारेचे कुंपन केले. लोखंडी फाटक तयार केली. आंतरिक रस्ते तयार केले. पंरतु आतापर्यंत ना उपविभागीय कार्यालय आले ना कर्मचाऱ्यांच्या सदनिका बांधण्यात आल्या. सदर कार्यालय व कर्मचाऱ्यांच्या सदनिका तुमसर येथे तयार करण्यात आल्या. नियोजनाच्या अभावी शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले. सदर जागा सध्या ओसाड पडून आहे.अधिकाऱ्यांनी सोयीनुसार शहरात वास्तव्य करता यावे म्हणून हे कटकारस्थान केले. बावनथडीचे मुख्य कार्यालय गोंदिया शहरात आहे. हे विशेष.बावनथडी प्रकल्पाचे सर्वच वरिष्ठ अधिकारी नागपूर, भंडारा येथून नियमित ये-जा करतात. उलट शेतकऱ्यांना तुमसर, गोंदिया येथे कामानिमित्त जावे लागते. प्रकल्प स्थळाजवळ नाकाडोंगरी येथे उपविभागीय कार्यालय सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य संगीता सोनवाने, संगीता मुंगूसमारे, पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले, सुरेश राहांगडाले, सरपंच दिलीप सोनवाने, ग्यानीराम गौपाले, ठाकचंद मुंगूसमारे यांनी केली आहे.
बावनथडीची प्रस्तावित जागा ओसाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 12:27 AM