शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आणणार समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 8:57 PM

रस्ते विकासाचे सशस्त माध्यम आहे. मनसर-बालाघाट सिवनी या दरम्यान दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ चे काम जोमात सुरु आहे. यामुळे हा मार्ग समृद्धी महामार्ग ठरणार आहे. सध्या मनसर-गोंदिया रस्ता दुपदरीकरणाचे खोदकामाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : मनसर-बालाघाट-सिवनी मार्ग, ७५३ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्ते विकासाचे सशस्त माध्यम आहे. मनसर-बालाघाट सिवनी या दरम्यान दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ चे काम जोमात सुरु आहे. यामुळे हा मार्ग समृद्धी महामार्ग ठरणार आहे. सध्या मनसर-गोंदिया रस्ता दुपदरीकरणाचे खोदकामाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय राष्ट्रीय राजमार्ग विभागाने हिरवी झेंडी दिली आहे. उत्तर भारतात जाण्याकरिता हा एक प्रमुख रस्ता ठरणार आहे.नागपूर-मनसर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मनसर ते गोंदिया १५१ कि.मी. रस्ता यापूर्वी राज्यमार्ग होता. मनसर-बालाघाट-सिवनी पर्यंत दोन राज्यांना जोडणारा रस्त्याला केंद्रीय राष्ट्रीय राज्यमार्ग मंत्रालयाने हिरवी झेंडी दिली. हा रस्ता समृद्धी महामार्ग ठरणार आहे. मनसर ते गोंदिया दरम्यान रस्त्याचे दुपदरीकरण खोदकामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली. सदर राष्ट्रीय महामार्ग मनसर-तुमसर-तिरोडा-गोंदिया-बालाघाट व सिवनी असा आहे.रस्ता नूतनीकरण कामाची किंमत ३१४ लक्ष एवढी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकामाचा त्यात समावेश असून त्यास समतल करून भराव करण्याची कामे आहेत. ३० नोव्हेंबर २०१७ ला कामे सुरु करण्याचा आदेश प्राप्त झाला होता. तर काम पूर्णत्वाची तारीख २५ मे २०१८ होती. तसे खापा शिवारातील फलकावर नमूद केले आहे. परंतु शेतकºयांच्या जमिनीचे हस्तांतरण करणे यात बराच वेळ येथे लागल्याचे समजते. सध्या ती कामे पूर्ण झाली आहेत. तिरोडा दरम्यान रस्ता कामाचे सिमेंटीकरण काही दिवसात सुरु करण्यात येणार आहे.भंडारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जातो. त्या रस्त्याला पर्याय तथा नागपूर - जबलपूर रस्त्याला मनसर येथून सरळ तुमसर-गोंदिया-सिवनी असा पर्याय उपलब्ध येथे होणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे रोड मॅप तयार केला. तुमसर-बालाघाट रस्ता यानंतर पुढच्या टप्प्यात सुरु होणार असल्याची माहिती आहे. सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम सुरु असून सुरक्षेकरिता पिवळी व पांढºया रंगाची रेती भरलेल्या पोती रस्त्याशेजारी काम सुरु असल्याचे दिशादर्शक म्हणून ठेवल्या आहेत.रात्रीच्या सुमारास येथे धोक्याची शक्यता आहे. रेडीयम पट्ट्या किंवा रेडीयमचे तोरण येथे बांधण्याची गरज आहे. सदर रस्ता वर्दळीचा असून जड वाहतूक या रस्त्याने मोठ्या प्रमाणात राहते. रस्ता खोदकाम एकाच वेळी दोन्ही बाजूला सुरु आहे. निदान एका बाजूचे खोदकाम व भरावानंतर दुसºया बाजूचे खोदकाम व भराव करण्याची गरज आहे. जुना रस्ता राज्य मार्ग असल्याने निमूळता आहे. त्यामुळे वाहनांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारी उपाययोजना येथे करण्याची गरज आहे.राष्ट्रीय महामार्गामुळे, उद्योग, व्यापार, शेतमालाची आवक तथा पर्यटन उद्योगाला येथे मोठी चालना मिळून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरची वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे.