श्रीरंग कुटुंबीयांचा एल्गार : आलेसूर येथील जमीन मोजमाप प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खाजगी शेजजमीनीवर खोट्या स्वाक्षऱ्या करणाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात आलेसुर येथील पीडित श्रीरंग कुटुंब तुमसर येथील भूमिअभिलेख कार्यालयासमोर सोमवारी आमरण उपोषण बसले.उपोषणकर्ते पीडित कुटुंब प्रमुख पांडूरंग रामचंद्र श्रीरंग यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आलेसुर त.सा.क्र. २ गर्रा बघेडा येथील शेतजमीन भुमापन क्र. ७३ ची आराजी ०.३५ आर ची मोजणी २५ मार्च२०१७ रोजी माझ्या नावाची खोटी स्वाक्षरी करुन लेहनदास इसाराम करमकर रा. आलेसुर यांनी मोजणी करण्याकरिता अर्ज सादर केला होता. तिची मोजणी करण्यात आली.सदर जागेची मोजणी आदिवासी मोजणी यापूर्वी १-१-२००२ ला करण्यात आली होती. या जागेची दोनदा मोजणी करण्यात आली असून दोन्ही मोजणीमध्ये मोठी तफावत आहे. या मोजनीवर श्रीरंग कुटूंबाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मोजणी करतांनी सहमालक यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली. बनावट स्वाक्षरीवर जमिनीचे मोजमाप करण्यात आले.सदर प्रकरणात बनावट स्वाक्षरी करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दखल करुन मोजणीत तफावत असल्याने मोजणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे. आमरण उपोषणाला पाडूरंग श्रीरंग, गौरीशंकर श्रीरंग, केशोराव श्रीरंग, दुर्गा श्रीरंग, सुषमा गौरीशंकर श्रीरंग बसले आहेत. तुमसर येथे मागील एक वर्षापासून नियमित उपअधिक्षकांचे पद रिक्त आहे. प्रभारींच्या भरवश्यावर कारभार सुरु आहे. सोमवारी या कार्यालयात एक-दोनच कर्मचारी उपस्थित होते. सर्व जमिनीचे मोजमाप करायला गेले असे सांगण्यात आले. सध्या प्रभारी उपअधिक्षक दिर्घ रजेवर गेल्याची माहिती आहे. संबंधित कार्यालयाच्या विरोधात अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नागरिकांनी येथे नियमित उपअधिक्षक नियुक्तीची मागणी केली आहे. अनेक प्रकरण येथे प्रलंबित असल्याची माहिती आहे.
भूमि अभिलेख कार्यालय विरोधात आमरण उपोषण
By admin | Published: May 30, 2017 12:25 AM