देशामध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज बेसुमार वाढत असून पेट्रोलने देशात शंभरी पार केली आहे. त्यातच केंद्रातील सध्याच्या भाजपा सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ करून देशातील शेतकऱ्यांना दुसरा मोठा धक्का देण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या १०:२६:२६ ची किंमत प्रति बॅग ६०० रूपयांनी तर डीएपी ची किंमत प्रति बॅग ७१५ रूपयांनी वाढविली. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम सध्याच्या केंद्र सरकारने केले आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, नरेंद्र झंझाडं, हेमंत महाकाळकर, बाबूराव मते, आरुजू मेश्राम, ईश्वर कळंबे, महेश भोंगाडे, योगेश ढोके आदी उपस्थित होते.
रासायनिक खताच्या भाववाढीच्या धोरणाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:38 AM