दोषींवर कारवाईची मागणी : संघटनांचे संयुक्त निवेदनभंडारा : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची बुलडोजर लावून काही लोकांनी तोडफोड केल्याची घटना २५ जूनरोजी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचा दि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर) भंडारा जिल्हा व समता सैनिक दल आणि सामाजिक न्याय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन देऊन निषेध नोंदविला.भवनाची तोडफोड करणाऱ्यांसह त्याला जबाबदार असणाऱ्यांना त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, तहसिलदार व पोलीस अधीक्षक यांच्या मार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात, रत्नाकर गायकवाड व त्यांच्या ६०० भाडोत्री गुंडांना त्वरीत अटक करण्यात यावी, दादर, भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस अधीक्षक यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, रत्नाकर गायकवाड यांना पिपल्स इम्प्रूमेंट ट्रस्टमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखण्यात यावे, मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री या घटनेची जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. अन्यथा दि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर) भंडारा जिल्हा व समता सैनिक दल आणि सामाजिक न्याय संघटना आंदोलन करेल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन पंतप्रधान यांच्यासह मुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आले आहे. मागण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी स्विकारले. निवेदन देताना समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे, राष्ट्रीय सचिव एम.आर. राऊत, सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष अचल मेश्राम, दि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया जिल्हाध्यक्ष प्रभाकर ठवरे, मदन बागडे, एम.आर. राऊत, माया उके, गोपिचंद बेले, श्रीराम बोरकर, हितेंद्र नागदेवे, नरेंद्र भोयर, वामन वैद्य, आनंदराव मेश्राम, हरीश्चंद्र रामटेके, अनिल चंद्रीकापुरे, राघवानंद हुमणे, सुषमा धारगावे, आशा बडोले, भाविका उके, सीमा बन्सोड, अल्का सतदेवे, आरती रंगारी, अमोल देवगडे, विनोद बन्सोड, डुलीचंद मेश्राम, विलास नागदेवे, अनिरूद्र राऊत, किसनजी इल्मकार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आंबेडकर भवन तोडफोड प्रकरणाचा निषेध
By admin | Published: July 07, 2016 12:30 AM