दोषींवर कारवाईची मागणी : भारतीय बौद्ध महासभाचे मुख्यमंत्र्यांना निवेदनभंडारा : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची बुलडोजर लावून काही लोकांनी तोडफोड केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचा भारतीय बौध्द महासभा शाखा भंडारा जिल्हा पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला. भवनाची तोडफोड करणाऱ्यांसह त्याला जबाबदार असणाऱ्यांना त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी भारतीय बौध्द महासभाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार व पोलीस अधीक्षक यांच्या मार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात, रत्नाकर गायकवाड व त्यांच्या ६०० भाडोत्री गुंडांना त्वरीत अटक करण्यात यावी, दादर, भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस अधीक्षक यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, रत्नाकर गायकवाड यांना पिपल्स इम्प्रूमेंट ट्रस्टमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखण्यात यावे, मुख्यमंत्री यांनी गृहमंत्री या घटनेची जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. अन्यथा भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौध्द महासभा व इतर सामाजिक संघटना आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात समीक्षक बौध्दत्रिय, प्राणहंस मेश्राम, हरकर उके, सुरेंद्र बंसोड, रंजित कोल्हटकर, सुरेश रंगारी, चंद्रबोधी मैत्रेयबौध्द, नामदेव कान्हेकर, पृथ्वीराज मेश्राम, उमाकांत रामटेके, देवीलाल नेपाले आदींचा समावेश होता.(नगर प्रतिनिधी)
आंबेडकर भवन तोडफोड प्रकरणाचा निषेध
By admin | Published: June 28, 2016 12:40 AM