लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पुरोगामी, धर्मनिर्पेक्ष विचाराच्या निर्भिड पत्रकार व डाव्या पक्षाच्या समहानुभूतीदार गौरी लंकेश बेंगलोर (कर्नाटक) यांचा ५ सप्टेंबरला धर्मांध व साम्प्रदायिक विचाराच्या लोकांनी गोळ्या घालून केलेल्या खुनाचा तीव्र निषेध करण्यासाठी व मारेकºयांना महाराष्ट्र शासन यांचे नावे जिल्हाधिकाºयांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात भाकपचे हिवराज उके, सदानंद इलमे, भारत मुक्ती मोच्याचे बळीराम सार्वे, समता सैनिक दलाचे एम.आर. राऊत, सामाजिक कार्यकर्ते अमृत बंसोड, महेंद्र वाहने, खुशाल लिमजे, भारिप बहुजन महासंघाचे रंजित कोल्हारकर, रिपब्लिकन सेनेचे अचल मेश्राम, प्रदीप गेडाम, राजन मेश्राम आदींचा समावेश होता.सदर निवेदनात ज्याप्रमाणे दोनवर्षापुर्वी डॉ. एम.एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून करण्यात आला. अजून त्यांच्या मारेकºयांचा शोध लागला नाही. याबद्दल चिंता व शोकांतिका व्यक्त केली. अगदी त्याचप्रमाणे गौरी लंकेश यांचा खून करण्यात आला व मारेकरी पसार झाले.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:29 PM
पुरोगामी, धर्मनिर्पेक्ष विचाराच्या निर्भिड पत्रकार व डाव्या पक्षाच्या समहानुभूतीदार गौरी लंकेश बेंगलोर (कर्नाटक)...
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांमार्फत निवेदन : भाकपने घेतला पुढाकार