चंद्रपूर जिल्ह्यातील वणी गावातील एका महिला व वयोवृद्ध व्यक्तींना जादूटोणाच्या संशयावरून भरचौकात हात-पाय बांधून मारहाण करण्यात आली. महाराष्ट्र राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असतानासुद्धा अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत. याचे कारण जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रसार आणि प्रचार शासनस्तरावर योग्यरीत्या केला जात नसल्याने अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्र शासनाने ताबडतोब शहरात व खेडोपाडी जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रसार आणि प्रचारासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी. चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराची योग्य चौकशी करावी तसेच घटनेतील पीडितांना शासनाने संरक्षण देण्यात यावे. दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, प्रधान सचिव प्रा. युवराज खोब्रागडे, लीलाधर बन्सोड यांनी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांच्यामार्फत निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
वणी येथील घटनेचा महाअंनिसच्या वतीने निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:33 AM