यावेळी खासदार व माजी आमदार चरण वाघमारे यांनी व्यवस्थेसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पूर्तता करण्याचे निर्देश दिले.
मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालय हे तालुक्याचे ठिकाण असूनही तेथे कोरोनाबाह्य रुग्ण तपासणी (ओपीडी) होत नसल्याने बाधित रुग्णांना वेळेवर औषधे मिळू शकत नाही, यावर योग्य व्यवस्था करण्यास सांगितले. या ठिकाणी कोरोना वॉर्ड सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या. ज्या ठिकाणी कोरोना तपासणी होते तेथे पाणी, स्वच्छता व अन्य सुविधा नसल्याच्या तक्रारी खासदारांपुढे काहींनी मांडल्या. यावेळी खासदार मेंढे यांनी तहसीलदारांना सोयी तात्काळ उपलब्ध करण्यास सांगितले. तुमसर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत याठिकाणी सध्या चार डॉक्टर कार्यरत असून, नव्याने सहा डॉक्टर देण्याच्या सूचना यावेळी माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रशासनाला दिल्या. दरम्यान रुग्णालयाला कोरोना रुग्णाच्या सोयीसाठी रुग्णवाहिका देण्याचे निर्देश दिले.