आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा - गोंदिया तसेच धान उत्पादक जिल्ह्यामध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे बºयाच शेतकºयाने धान रोवणी केलेली नाही. तर काही शेतकऱ्यांनी कमी पावसामुळे रोवणी केली. परंतु त्यातच यावर्षी तुडतुडा रोगामुळे धान पीक संपूर्ण सरसकट नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फार खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धान पिकाच्या रोवणीकरिता बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे सुद्धा कठीण झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक बाबीचा विचार लक्षात घेता शासनातर्फे शेतकऱ्यांना सरसकट धानाला प्रती क्विंटल ३०० रूपये प्रमाणे प्रोत्साहन अनुदान मिळवून देण्याची मागणी आमदार डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मागणी केली
शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्या -फुके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:06 AM