आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकीनचा वापर व्हावा व वैयक्तिक स्वच्छता प्राधान्याने पाळली जावी यासाठी जाणीवजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नेतृत्वात भंडारा, तुमसर व साकोली येथे सॅनेटरी नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेचा संदेश देणारा ‘पॅडमॅन’ चित्रपट दाखवून जनजागृती करण्यात आली.ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयींन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकीन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व माफक दरात सॅनेटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याकरिता अस्मिता योजनेचा शुभारंभ राज्यस्तरावर झाला आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्यावतीने किशोरवयींन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकीनचा वापर व्हावा व वैयक्तिक स्वच्छता प्राधान्याने ठेवली जावी, यासाठी जनजागृतीसाठी पुढाकार घेण्यात आला.भंडारा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या भंडारा येथे २६९ किशोरवयींन मुलींसोबत ५० शिक्षिकांनीही विद्यार्थिंनींसोबत चित्रपटाचा आस्वाद घेतला.यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी गटविकास अधिकारी सपाटे, गटशिक्षणाधिकारी चरपे, शिक्षण विस्तार अधिकारी कविता पाटील, विना सिंगणजुडे, हेमलता सरोदे, अर्चना सरोदे, अर्चना भेदरकर, कविता कोरे, शितल वडे, संघमित्रा रामटेके, जोत्सना बोंबार्डे, समुह समन्वयक स्मृती सुखदेवे, करूणा देशभ्रतार सहभागी झाले होते. तुमसर येथे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या २३० विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. उल्लेखनिय म्हणजे तुमसरच्या सभापती रोशनी नारनवरे यांनी स्वत: विद्यार्थिंनींसोबत पॅडमॅन चित्रपट बघितला. गटविकास अधिकारी निर्वाण, गट शिक्षणाधिकारी आदमने, विस्तार अधिकारी भलावी, विस्तार अधिकारी भुजाडे, सुरेंद्र ठाकरे, महेश बडवाईक, आदी उपस्थित होते.
‘पॅडमॅन’द्वारे वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:49 PM
जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकीनचा वापर व्हावा ...
ठळक मुद्देभंडारा, तुमसर, साकोलीत आयोजन : जिल्हा परिषद शाळांच्या मुलींनी बघितला चित्रपट