लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जैविक कीड व्यवस्थापनासंबंधी जनजागृती व्हावी व आपल्या विभागात त्याच्या कीड नियंत्रणासाठी वापर वाढावा या उद्देशाने कृषी संशोधन केंद्र, साकोली मार्फत मौजा कुंभली ता.साकोली येथे रबी हंगाम २०१८-१९ मध्ये नऊ शेतकऱ्यांच्या शेतावर हरभऱ्यावरील घाटेअळीच्या व्यवस्थापनाकरिता एच.ए.एन.पी.व्ही. प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांच्या अर्काचा वापर यावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्या अनुषंगाने कृषी संशोधन केंद्र, साकोली व कृषी विभाग साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभली येथे शेतीदिन आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला कृषी संशोधन केंद्राचे कनिष्ठ कीटकतज्ज्ञ डॉ.बी.एन. चौधरी, कृषी विभाग साकोलीचे कृषी पर्यवेक्षक आर.ए. खोब्रागडे, सुकळीचे कृषी सहाय्यक एच.सी. चव्हाण हे उपस्थित होते. या शेतीदिनामध्ये डॉ.चौधरी यांनी हरभऱ्यावरील घाटेअळीची ओळख, जीवनक्रम व एकात्मिक व्यवस्थापनाबाबत विस्तृत माहिती दिली.यासोबतच या किडीच्या व्यवस्थापनामध्ये एचएएनपीव्ही प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांच्या अर्काचा वापराचे महत्व विशद करून याचा वापर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन केले.खोब्रागडे यांनी कृषी विभागामार्फत राबविलेल्या हरभऱ्यावरील प्रात्यक्षिकांची माहिती दिली. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या शेतीदिनाचे संचालन व आभार प्रदर्शन चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी मन्साराम भेंडारकर व कृषी संशोधन केंद्राचे रामशेखर भेंडारकर यांचे सहकार्य लाभले.
कुंभलीत जैविक कीड व्यवस्थापनावर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 9:55 PM
लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जैविक कीड व्यवस्थापनासंबंधी जनजागृती व्हावी व आपल्या विभागात त्याच्या कीड नियंत्रणासाठी ...
ठळक मुद्देकृषी संशोधन चमूचा पुढाकार : बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन