डोअर टू डोअर प्रचार : निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु, निवडणूक तयारी पूर्णभंडारा : जिल्हा परिषद निवडणुकीची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून दि. ४ जुलै रोजी मतदान होणार असून ४८ तासांपूर्वी म्हणजेच उद्या २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. मात्र मूक प्रचार, गाठीभेटी आणि वृत्तपत्रांमधील जाहिरातीच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार दि.४ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ३१० आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ५३३ असे एकूण ८४३ उमेदवार भाग्य आजमावित आहेत. प्रचारासाठी उमेदवारांकडे केवळ दोनच दिवस उरले आहे. आता मतदारांची थेट भेटी घेणे आणि जोडतोडवर उमेदवार भर देत आहेत. मतदारसंघातील अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा लागली आहे. सभा, रॅली, पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांना गळ घातली जात आहे. प्रचारावर सर्वच प्रमुख पक्षांच्या आघाड्यांनी भर दिला आहे. प्रचारसभा, पदयात्रांनी वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत ७ लाख ५७ हजार २५१ मतदार असून यात ३ लाख ८५ हजार ९७७ पुरुष आणि ३ लाख ६९ हजार ९७७ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ९८१ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी ४ हजार ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी १,००० ईव्हीएम मशिनची आवश्यकता आहे. एका ईव्हीएम मशिनवर १२ उमेदवारांचे नाव नोंदविण्यात येणार आहेत. त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिल्यास त्याठिकाणी दोन मशिन ठेवण्यात येणार आहेत. पावसाचे दिवस लक्षात घेऊन मतदान प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेऊन मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज आहे. शुक्रवारी (दि.३) सर्व मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचारी संबंधित केंद्राच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)गुप्त बैठकांवर भरनिवडणूक आणि पैसा हे समीकरण आहे. आचारसंहिता असली तरी मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. उमेदवारांना दोन रात्र मिळणार असून या दोन रात्रीत सर्व काही सेट केले जाते. यावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने गुप्तहेर पेरले आहेत.
जाहीर प्रचार सायंकाळी थंडावणार
By admin | Published: July 02, 2015 12:39 AM