रंजित चिंचखेडे ।आॅनलाईन लोकमतसिहोरा (सिहोरा) : सिहोरा परिसरात अधिक लोकवस्ती असणाºया गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असले तरी, या शौचालयाचे दरवाजे कुलूप बंद आहेत. ग्राम पंचायतीची उदासीनता दिसून येत असली तरी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.सिहोरा परिसरातील गावे आघाडी शासनाचे कार्यकाळात निर्मल ग्राम तथा हागणदारीमुक्त गावे झाली आहे. उर्वरित शौचालयाचे बांधकाम रोहयो अंतर्गत गावात करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे या उपक्रमाने रस्त्यावर दिसणारी घाण आता दिसत नाही. गावात गावकरी शौचालयाचा उपयोग करित असल्याचे चित्र सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात आहे. गावात शौचालय बांधकामाचा उपक्रम राबविण्यात आल्यानंतर शहराचे धर्तीवर तीन हजार पेक्षा अधिक लोकवस्तीचे गावात सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात आले आहे.यात सिहोरा, चुल्हाड आणि बपेरा गावात अशी शौचालय बांधकाम करण्यात आली आहेत. परंतु शौचालय बांधकाम करण्यात आले असले तरी, त्यांचे दरवाजे सुरूवातीपासून कुलूप बंद आहेत. यामुळे या शौचालयाचा कुणी उपयोग करताना दिसून येत नाही. चुल्हाड गावात असणाऱ्या शौचालय शेजारी केर कचरा व मातीचे ढिगारे आहेत. यामुळे सार्वजनिक शौचालय दिसेनाशी झाली आहेत. ही शौचालय उपयोगितेविना पडून आहे.गावात असणाऱ्या या शौचालयाचे दुरूस्ती व स्वच्छेसाठी ग्रामपंचायत मार्फत पुढाकार घेतले जाणार असल्याची माहिती उपसरपंच इंद्रपाल सिंग सोलंकी यांनी दिली आहे. दरम्यान सिहोरा गावात आठवडी बाजाराचे शेजारी अशा शौचालयाचे बांधकाम करण्यात आली आहे. ही शौचालय कुलूप बंद असल्याने नागरिकांना त्याचा उपयोग होत नाही. बाजारात येणारे ग्राहक आणि विके्रत्याची धांदल होत आहे.जनतेच्या सेवा व उपयोगासाठी लाखो रूपये खर्चून बांधकाम करण्यात आलेले कुलूप बंद शौचालय खुले करण्याचा निर्णय सिहोरा ग्रामपंचायतचे सरपंच मधु अडमाचे यांनी घेतला आहे. या शौचालयात घाण निर्माण करणारे इसमावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतले जाणार आहे.दरम्यान गावात खाजगी गाडे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या गाडे बांधकाम धारकांनी दुकानदारासाठी स्वतंत्र शौचालय व मुत्रीघराची निर्मिती केली नाही. यामुळे भिंतीचे आडोसे मुत्रीघर ठरत आहेत.सिहोºयात सार्वजनिक शौचालय कुलूप बंद असली तरी ती नागरिकांचे उपयोगासाठी बांधकाम करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात शौचालयाचे दरवाजे खुली केली जाणार आहे. गावात स्वच्छता ठेवण्यासाठी गावकºयांचे सहकार्याची अपेक्षा आहे.-मधु अडमाचे, सरपंच सिहोरा.
सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे कुलूप बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:40 PM
सिहोरा परिसरात अधिक लोकवस्ती असणाºया गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असले तरी, या शौचालयाचे दरवाजे कुलूप बंद आहेत. ग्राम पंचायतीची उदासीनता दिसून येत असली तरी स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.
ठळक मुद्देगोदरीमुक्त अभियानाला हरताळ : स्वच्छतेसाठी ग्रामपंचायती पुढाकार घेणार