विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या पेंढरी पुर्नवसन ग्रामवासीयांना गत एक महिन्यांपासून गावात कुठेही शुध्द पिण्याचे पाणीच मिळेनासे झाले आहे. पुर्नवसन ठिकाणी एकुण सहा बोअरवेल व एक विहिर आहे. परंतु विहिरीने तळ गाठल्याने विहिरीत पाणी नाही. बोअरवेलला पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. यामुळे येथील महिलांना गावालगतच्या सोनेगाव बुटी येथून पिण्याचे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे..अनेक गावांचे पुर्नवसन झाले असले तरी तेथील मुलभूत सोयीसुविधेकडे नेहमी दुर्लक्ष होत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन तथा तालुका प्रशासन, ग्राम प्रशासन यांनी लक्ष घातले असते तर जिल्ह्यातील पुर्नवसन ग्रामवासींना पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. वेळोवेळी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असते का? हा एक प्रश्नच आहे.गावातील सहा हातपंपापैकी ज्या हातपंपाचे पाणी येथील ग्रामस्थ पिण्यासाठी वापर करीत होते. आता त्या बोअरवेलला गढुळ पाणी येणे सुरु झाले. त्याचे एकमेव कारण ग्रामस्थांच्या मते जेव्हापासून त्या हातपंपावर पाणी उपसा करण्याची मोटार लावली, तेव्हापासून पाणी गढुळ येत आहे.त्यामुळे आता पिण्याचे पाणी बाहेरगावच्या बोअरवेलवरुन आणावे लागत आहे.एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात बॉटलभर शुध्द पिण्याचे पाणी नसेल तर तत्काळ त्याची व्यवस्था कुठून ना कुठून तरी होते. परंतु पेंढरी पुर्नवसनातील तीनशे ते चारशे ग्रामवासीयांना तात्काळ शुध्द पिण्याचे पाणी कोण उपलब्ध करुन देणार? या पुर्नवसन मधील प्रत्येक ग्रामस्थ विकतचे पाणी घेऊ शकणार का? स्वत: विकतचे पाणी घेऊन प्यायला पैसे नाही तर मग पाळीव प्राण्यांना न्यायचे कुठे, असाही सवाल यावेळी ग्रामस्थांनी केले.ज्येष्ठ महिलांच्या डोळ्यातुन अशी समस्या पाहुन पुर्नवसन झालेच बेकार असे जाणवत होते. घर गेले, शेती गेली, रोजीरोटीही गेली आणि आज अन्न सोडा प्यायला शुध्द पाणी मिळत नसणार तर काय दु:ख होत असेल, असा सवाल पेंढरी पुर्नवसन वासीयांनी केला आहे. वृध्द महिला पुरुषांंचा विचार करुन प्रशासनाने तत्काळ समस्या सोडविण्याची नितांत गरज आहे.ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणे हे अतिआवश्यक आहे. होणाºया मासीक सभेच्या बैठकीत हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.-तुळशीदास कोल्हे, सदस्य, पंचायत समिती, पवनी
पेंढरी पुर्नवसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:16 AM
जवळपास ४०० लोकसंख्या असलेल्या पेंढरी पुर्नवसन ग्रामवासीयांना गत एक महिन्यांपासून गावात कुठेही शुध्द पिण्याचे पाणीच मिळेनासे झाले आहे. पुर्नवसन ठिकाणी एकुण सहा बोअरवेल व एक विहिर आहे. परंतु विहिरीने तळ गाठल्याने विहिरीत पाणी नाही. बोअरवेलला पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही.
ठळक मुद्देविहिर पडली कोरडी : बोअरवेलच्या दूषित व गढूळ पाण्याने धोका