महसूल विभागाला वारंवार केलेल्या विनवणीने तब्बल २५ वर्षांनंतर अतिक्रमण हटविले असून, सदर शेतजमीन मोकळी असल्याचे तलाठी यांनी लेखी पुराव्यासह स्पष्ट केले. सदर शेतजमिनीचे मूळ मालकाने जिल्हाधिकारी यांना वारंवार शेतजमीन मागणी न्याय संदर्भात पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी सहृदयता दाखवित, लाखनीचे तहसीलदार यांना मोका चौकशीचे निर्देश दिले होते. चंद्रभान मारोती हेडाऊ असे अन्यायग्रस्त वृद्ध शेतकऱ्याने नाव आहे. १९७५-७६ मध्ये सरकारी पट्ट्यातील भूमापन क्रमांक ३२४, क्षेत्र १०.११ हे. आर क्षेत्रफळातील एक हेक्टर आर शेतजमीन शासकीय वाटपात मिळाली. जमिनीचा सातबाराही नावावरती झाला. १९९२ पर्यंत त्या शेतजमिनीची मशागत करून कुटुंब सांभाळले. मात्र, दुष्काळ ओढावून, नापिकी होऊ लागली. परिस्थिती हलाखीची असून, पैशाची अडचण भासल्याने गावातीलच पाटलाला १९९३ला क्षुल्लक रकमेत तात्पुरती कसायला दिली असता, बनावट व बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे माझ्या हक्काच्या शेतजमिनीवर गैरअर्जदाराने कायमस्वरूपी कब्जा केल्याचे उपविभागीय अधिकारी साकोली यांचे न्यायालयीन निर्णयाद्वारे स्पष्ट झाले होते.
ही शेतजमीन २०१६ रोजी शासनजमा करण्यात आली असून, शेतजमीन मोकळी आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतजमीन मागणी संदर्भात केलेल्या सततच्या विनवणी फळास येत असून, महसूल विभागाने दखल घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राप्रमाणे तहसीलदार लाखनी यांच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांनी थेट मोक्यावर जाऊन पंचनामा केला असता, एक हेक्टर शेतजमीन मोकळी असल्याचे दिसून आले. यावेळी मंडळ अधिकारी राकेश पंधरे, तलाठी प्रवीण कौरवार, शेतकरी चंद्रभान हेडाऊ आदी उपस्थित होते.
फोटो