भंडारा : शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक धाेरण लागू केले. त्यामुळे ई-बाईक खरेदीचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश इलेक्ट्रिक बाईकची क्षमता २५० वॅट पेक्षा कमी असते. तसेच वेग मर्यादा २५ किलाेमीटर पेक्षा कमी असते. परंतु अनेकजण वेग वाढविण्याच्या दृष्टिकाेनातून ई-बाईकमध्ये बदल करीत असतात. परंतु असे आढळून आल्यास फाैजदारी कारवाईला सामाेरे जावे लागू शकते.
ई-बाईक घेताना काय काळजी घ्याल
प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानांकनानुसार ई-बाईक असल्याची खातरजमा करावी, वाहन वितरक व उत्पादक यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेने टाईप अप्रुव्हल टेस्ट रिपाेर्ट व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परवानगीची खातरजमा करावी.
२५० वॅट क्षमतेच्या वाहनांची हाेणार तपासणी
ई- बाईक्स व ई-वाहने यांना माेटार वाहन करातून धाेरण कालावधीसाठी १०० टक्के सूट दिली जाते. वाहनात बेकायदेशीर बदल केला जाताे.
.... तर गुन्हा दाखल
तपासणी माेहिमेत दाेष आढळल्यास वाहन कायदा १९८८ तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत पाेलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
ई- वाहनात बदल टाळा
ई- वाहनामध्ये नागरिक, उत्पादक व वितरकांनी बदल, अनधिकृत बदल करु नयेत. वाहनात बदल केले असल्यास ते पूर्ववत करावे.
ई-वाहन खरेदी करताना प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेले वाहन असल्याची खातरजमा करावी. वाहनात अनधिकृत बदल करु नये. ज्यांनी वाहनात अनधिकृत बदल केले आहेत. बदल आढळून आल्यास संबंधित वाहन उत्पादक, वितरक व वाहनधारकांवर फाैजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी