लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव चौ. : शासकीय धान खरेदी केंद्र गोडावून क्षमता संपल्यामुळे मागील आठ दिवसांपासून धान मोजणी बंद आहे. त्यामुळे चौरास भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे केंद्राबाहेर धानाच्यव पोती उघड्यावर ठेवल्या आहेत.मागील दोन महिन्यांपासून आसगाव येथे बाजार समितीच्या यार्डात शासकिय धान केंद्र सुरु होते. या गोदामात शासनामार्फत ५०९४ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. त्या धानाच्या चुकाऱ्या पोटी शेतकऱ्यांना १२ डिसेंबर पर्यंत मोजलेल्या धानाचे चुकारे सुध्दा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. परंतु आता आठ दिवसापासून गोडावून मध्ये मोजलेला माल साठवून ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे धानाची मोजणी बंद आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना धान मोजणीसाठी आता निलज जवळील आमगाव येथे धान मोजण्यासाठी जावे लागत आहे. आमगाव येथे धान मोजण्यासाठी जाने म्हणजे शेतकऱ्यांवर जाण्यायेण्याचा व गाडी भाड्याचा हजारो रुपयांचा खर्च शेतकऱ्यांवर बसत आहे. त्यामुळे आसगाव येथील गोडामातील माल शासनाने उचलावा व येथील शेतकºयांना धान मोजण्यासाठी जागा मोकळी करुन दयावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.आसगाव, चकारा, पौनी तील गोदाम भरले आहे. माल उघड्यावर दोन हजार क्विंटल पडला आहे. दोन महिन्यापासून ठेवलेले धानाबाबत सुचना करुन व लेखी डि.ओ. दिले नाही. यामुळे खरेदी-विक्री संस्था डबघाईस आलेली आहे. त्यामुळे शासनाने या धान्याची गोदामातून लवकर उचल करण गरजेचे आहे.-माणिकराव ब्राम्हणकर,अध्यक्ष ख.वि. संस्था, पवनी
गोदामाअभावी धान खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:43 AM
शासकीय धान खरेदी केंद्र गोडावून क्षमता संपल्यामुळे मागील आठ दिवसांपासून धान मोजणी बंद आहे. त्यामुळे चौरास भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : चौरास भागातील प्रकार