लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी तंत्रस्रेही शिक्षकांची कोअर कमिटी तयार केली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 'प्रेरणा' उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण समितीने मंजुरी प्रदान केली. १९ सप्टेंबरला पितृमोक्ष अमावस्येची सुटी रद्द करून २० सप्टेंबरला स्थानिक सुटी मंजूर करण्याचा ठराव या समितीने घेतला.शिक्षण समितीची सभा लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद सेमी इंग्लीश प्राथमिक शाळा खराशी येथे आज पार पडली. यावेळी हा ठराव घेण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या सभाध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेला शिक्षणाधिकारी मोहन चोले, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, प्रणाली ठाकरे, वर्षा रामटेके, प्रेरणा तुरकर, धनेंद्र तुरकर, मुख्याध्यापक मुबारक सैय्यद, तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या प्रेरणेतून व मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणाºया महत्वाकांक्षी 'प्रेरणा' या उपक्रमाला समिती सदस्यांनी मंजुरी प्रदान केली. यासह मानव विकास कार्यक्रमांतर्गत मासिक पास सवलत ज्या विद्यार्थ्यांना मिळते त्या लाभार्थ्यांना सायकल देऊ नये असा ठराव घेण्यात आला.ज्या शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद झाल्या आहेत त्या शाळेच्या भग्नावस्थेत असलेल्या इमारतींची चौकशी करून त्यांचा लिलाव करून प्राप्त निधी जिल्ह्यातील गुणवत्ता विकास कार्यक्रमावर खर्च करावा, इयत्ता ५ वी ते १० वीच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करायचा असेल तर शिक्षण उपसंचालक यांची परवानगी घ्यावी, टाकाऊ पदार्थांपासून ४० प्रकारचे विद्याज्ञानाचे प्रकार तयार करून इयत्ता १ ली ते ८ वीच्या प्राथमिक शाळांना माध्यमिक शिक्षक मार्गदर्शन करतील असा ठराव यावेळी घेण्यात आला.खराशी शाळेचा अभिमानराज्यातील गुणवत्ता विकासात अव्वल शाळा ठरलेली जिल्हा परिषदेची खराशी शाळा जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. या शाळेच्या धर्तीवर जिल्ह्यात इयत्ता १ ली ते ८ वीच्या शाळांचा गुणवत्ता विकास करण्याची योजना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी हाती घेतली आहे. या शाळेत सभेदरम्यान शिक्षण समिती सदस्यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या गुणवत्ता विकास कार्यक्रमाची स्तुती करून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत खराशी पॅटर्न राबविण्याचाही संकल्प यावेळी केला.यावेळी समिती सदस्यांनी शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली व विद्यार्थ्यांकडून त्यांना दिल्या जाणाºया शालेय ज्ञानाचीही माहिती घेतली.
गुणवत्ता विकासाची ‘प्रेरणा’ मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:34 PM
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी तंत्रस्रेही शिक्षकांची कोअर कमिटी तयार केली आहे.
ठळक मुद्देशिक्षण समितीचा ठराव : पितृमोक्ष अमावस्येची सुटी रद्द, खराशी शाळेत पार पडली जि. प. शिक्षण समितीची सभा