सामंजस्य करारनामा : कारखाना सुरु होण्याची शक्यता राहुल भुतांगे/मोहन भोयर तुमसरकंपनी व कामगारांच्या वादात अडकून बंद पडलेल्या कारखान्याला अॅक्सीस बँकेच्या पुढाकाराने नवसंजीवनीच मिळाली व कामगार तसेच कंपनी व्यवस्थापकात समेट घडवून सामंजस्य करारनामा करवून घेतला. त्यामुळे बायप्रविष्ठे असलेल्या प्रकरणाला ही आता पूर्ण विराम मिळाला असून कामगारांचा उदरनिर्वाहचा ही प्रश्न तुर्तास मिटला. भविष्यात दोन ते तिन वर्षात कारखाना सुरु होण्याचा मार्ग सुकर झाला.तुमसर लगतच्या माडगी येथील युनिव्हर्सल फेरो अॅन्ड अलाईज केमिकल्स लिमिटेड मानेकनगर हा कारखाना १८.०८.२००६ पासून कायम बंद करण्यात आला होता. त्या विरोधात येथील कामगार संघटनेनी न्यायालयात धाव घेतली होती. सन २००६ पासून हे प्रकरण न्यायालयात सुरुच होते. तेव्हा २७८ कामगारांनी स्वत:च्या नावाने न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. काम बंद असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले. कित्येकांचे मानसिक संतुलनही बिघडले. तर २७८ पैकी ४० ते ५० कमागारांचा मृत्यूही झाला तर उर्वरित कामगारांचा उदरनिर्वाहचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीत कंपनी व्यवस्थापक व कामगारांमध्ये अनेक बैठका झाल्या पंरतू तोडगा काही निघत नव्हता. कारखाना हा अॅक्सीस बँकेकडे मर्ज केलेला असल्याने बँकेलाही आपले पैसे काढून घ्यायचे होते. परंतू कामगार व कंपनी व्यवस्थापक यांच्या समेट होत नव्हता. त्यामुळे यांच्यात समेट घालून कामगारांचा तसेच कंपनीचा हिताचा एक सामजस्य करार घडवून आणण्याची किमया ही अॅक्सीस बँकेचे प्रतिनिधी एस. पी. लालवानी करुन दाखविली. २४ मार्च २०१७ ला कामगार युनियन आणि कंपनी व्यवस्थापक यांच्यात समन्वयक कारारनामा करण्यात आला. त्यावेळी कंपनी व्यवस्थापक प्रतिनिधी रामकुमार (मुंबई) निधी अग्रवाल, नरेंद्र पडोळे, एस. पी. लालवानी, ए. एस. लालवानी, योगेश सिंगनजुडे, ताराचंद कहालकर, पवन बैस, दिनेश पहिरे, एस. डी. ठाकुर, जाकीर शेख, शंकर मेश्राम, अरुण कांबळे, सहादेव दिवटे, लक्ष्मण शुक्ला, अब्दुल कयुम हे उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापनचे प्रतिनिधी रामकुमार यांनी सांगितले की कंपनी मालकाची ही पहली कंपनी असल्याने मालक कंपनी उघडण्यास तयार होते. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निर्णय लांबणीवर गेला परंतु आता ते राहले नाही. त्यामुळे कंपनी लवकरच सुरु होईल असेही सांगितले होते. दरम्यान येथील कामगारांनी लालवानी तसेच रामकुमार यांचे स्वागत करण्याकरिता बोलावले असता पत्रकार परिषदेचा ही आयोजन करण्यात आला. त्यावेळी कंपनीला सुरु होण्यास दोन ते तीन वर्षाचा कालावधी निश्चित लागणार आहे. कपंनीच्या मशिनरी गत १४ वर्षापासून बंदच्या अवस्थेत आहे. त्यामुळे तिथुन कोणती व्हायन्रेटी मिळणार त्यावरुन कपंनी विचार करुन तसी कंपनी सुरु करेल मात्र तुर्तास कामगारांची थकबाकी व बँकेचे पैसे कंपनीचा रॉ मटेरिअल विकून अदा करणार आहे. व माल विकण्याच्या प्रोसेसला सुरुवातही झाली असून कामगारांना त्यांचे पैसे दिल्या जाणार असल्याने कामगारात उत्साह आहे. व यापुढे युनिव्हर्सल फेरो अॅड अलाईड केमिकल्स लि. मानेकनगर या नावाऐवजी केमिकल्स फेरो अलाईड प्रा. लि. तुमसर असे करण्यात आले असून सध्या कारखाना सुरु होत नसून सध्या मालाची विक्री सुरु झाली आहे.
युनिव्हर्सल कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला
By admin | Published: April 08, 2017 12:26 AM