आॅनलाईन लोकमततुमसर : पाटबंधारे विभागामार्फत रनेरा ते कर्कापूर दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या नहराच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चांदपूर जलाशयाला जोडल्या जाणाऱ्या नहराच्या कामात वापरण्यात येत असलेले मुरुम व सिमेंटच्या कामात नियमांचे उल्लंघन होत आहे.चांदपूर जलाशयात जोडल्या जात असलेल्या रनेरा ते कर्कापूर दरम्यानचा २ किमी अंतराचे नहर तयार करण्याची कामे सुरु आहे. त्या नहराच्या कामाची सुरुवात मे महिन्यात करण्यात आली होती. त्या कामाकरिता रनेरा येथील खाणीतून २०० ब्रास मुरुम खणनाची परवानगी देण्यात आली. मुरुम उत्खननाकरिता परवानगीच्या ठिकाणाहून उत्खनन न करता हरदोली येथील शेतकऱ्यांच्या शेतातून उत्खनन करण्यात आले. या कामात शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. सदर नहराचे काम कर्कापूर हरदोली दरम्यान मुख्य वितरिकेतून बायपास करून रनेरा पर्यंत होत आहे. मुरुम उत्खननाचे लिजचे ठिकाण रनेरा गावातील तलावाचे व खणन मात्र हरदोली येथील शेतजमिनीतून झाल्यामुळे शासनाच्या महसूल विभागाची दिशाभूल करण्यात आल्याची तक्रार हरदोलीचे सरपंच नितीन गणवीर यांनी केली आहे. या प्रकारापासून महसूल विभाग अनभिज्ञ आहे. त्या नहर बांधकामाची अंदाजे रक्कम ४१ ला रूपये असून एकुण अंतर दोन कि.मी.चे आहे. कामाच्या ठिकाणी दर्शनी भागावर कसल्याच प्रकारचे फलक लावण्यात आले नाही.नहर कामाच्या पहिल्या टप्प्यात ८०० मीटर अंतरापर्यंत मुरुमाचे बेड पसरविण्याची परवानगी देण्यात आली. वितरिकेच्या कामादरम्यान मुरुम पसरविताना त्याची जाडी व सिमेंटीकरणाची जाडी नियमांप्रमाणे १० सेमी असणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात होत असलेल्या कामात तसे दिसून आली नाही. नहर बांधकामाची गुणवत्ता चाचणी, कॉम्पेक्शन चाचणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नहर बांधकामाचे शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता हे पद एकाच अधिकाऱ्याकडे असल्यामुळे सदर कामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.नहर बांधकामात कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकारची अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. तसे असल्यास अभियंता या नात्याने सर्वस्वी जबाबदारी माझी राहील.- गंगाधर हटवार, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, तुमसर.गत वर्षाच्या मे महिन्यात रनेरा गावचा पदभार माझ्याकडे नसल्यामुळे मला गौण खनिजाच्या लिजबद्दल माहिती नाही. मात्र कार्यालयाला विचारणा करूनच माहिती देण्यात येईल.- मनोज वरखडे, तलाठी, रनेरा.या कामात अनियमितता होत असून लिज रनेरा येथील असून उत्खनन हरदोलीतील शेतकºयांच्या शेतातून करयात आली. शासकीय नियमांची येथे पायमल्ली केली जात आहे.-नितीन गणवीर, सरपंच, हरदोली.
रनेरा ते कर्कापूर नहर बांधकामावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:21 PM
पाटबंधारे विभागामार्फत रनेरा ते कर्कापूर दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या नहराच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ठळक मुद्देमहसूल विभाग अनभिज्ञ : लिज रनेरा गावाची-मुरुम खनन हरदोलीतून