लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रामटेक- तुमसर राष्ट्रीयय महामार्गाचे काम पुन्हा सुरु झाले. देव्हाडी-खापा शिवारात रस्त्यावर मुरुम भराव करणे सुरु आहे. दरम्यान उसर्रा-सालई येथील शासकीय व खाजगी जमिनीतून मुरुमाचे उत्खनन सुरु आहे. रस्त्याच्या कामवर घातलेल्या मुरुम भरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.मुरुम उत्खनन करण्याच्या अटी व शर्ती आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत जागेतून सर्रास मुरुम उत्खननाला महसूल प्रशासनाने परवानगी कशी दिली हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. रामटेक - तुमसर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. मागील वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. खापा- देव्हाडी शिवारात सध्या मुरुम भरावाचे काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. भरावातील मुरुमावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.सालई - उसर्रा शिवारात राष्ट्रीय महामार्गालगत शासकीय व खाजगी जमिनीतुन मुरुम उत्खनन करण्यात येत आहे. यापुर्वीही येथे मुरुम उत्खनन प्रकरणाची तक्रार करण्यात आली होती. नियमबाह्य व नियमाला डावलून मुरुम उत्खनन प्रकरण येथे गाजले होते.मोहाडी तालुक्यातील मुरुम उत्खनन प्रकरणी महसुल प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. काही महिने येथे काम बंद पडले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु होते. रस्त्याच्या कामाला गती आली आहे.राष्ट्रीय महामार्गालगत मुरुम उत्खनन करण्याकरिता येथे परवानगी कशी मिळाली. हा संशोधनाचा विषय आहे. मुरुम उत्खननाचे कडक नियम आहेत. जमिनीत खोल खड्डे येथे करण्यात आले आहेत. रस्त्यालगत मुरुम उत्खनन व वाहतुक करणे सुरु असतांना कुणीच त्यावर बोलायला व कारवाई करतांना दिसत नाही.नियमाची प्रतीक्षाकेंद्रीय भुपृष्ठ मंत्रालयाने मुरुम उपलब्ध करुन देण्याकरीता प्रयत्न सुरु आहे. राज्य शासनाला राज्यातील तलाव, बोडी यांना खोल करुन त्यातील मुरुम सरसकट उत्खननाची परवानगी द्यावी अशा सुचना करण्यात आल्या आहेत. परंतु येथे तलाव, बोडी येथून मुरुम उत्खनन करण्यात आले नाही. त्यामुळे जिथे मुरुम उपलब्ध आहे. त्यातुन मुरुम उत्खननाची परवानगी कंत्राटदार घेतात, परंतु परवानगीपेक्षा कितीतरी पट जास्त मुरुमाचे उत्खनन करणे सुरु आहे. तक्रारीनंतरच येथे दखल घेतली जाते, हे विशेष.कंत्राटदाराची दमछाककोट्यवधीचा रस्ता बांधकाम करतांना ठराविक नियम नक्कीच आहेत. परंतु नियमाकडे येथे दुर्लक्ष केले जात आहे. रस्ता भरावाकरिता मुरुमाची गरज आहे. मुरुम उपलब्ध करण्याकरिता कंत्राटदाराला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोठ्या प्रमाणात मुरुम लागत असल्याने एवढा मुरुम उपलब्ध करतांना कंत्राटदाराची दमछाक होत आहे. त्यामुळेच रस्ता भरावात अनधिकृत मुरुम उत्खननाची शक्यता अधिक बळावली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावीमुरुम उत्खनन प्रकरणी भरारी पथक तयार करुन मुरुम उत्खनन स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करुन चौकशी करण्याची गरज आहे. येथे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असुन शेतजमीन व पडीक जमीन विद्रुप होत आहे. मुरुम उत्खननानंतर खड्डे मातीने भराव करण्याची गरज आहे.
राष्ट्रीय महामार्गावर मुरुम भरावावर प्रश्नचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:00 AM
मोहाडी तालुक्यातील मुरुम उत्खनन प्रकरणी महसुल प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. काही महिने येथे काम बंद पडले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु होते. रस्त्याच्या कामाला गती आली आहे. राष्ट्रीय महामार्गालगत मुरुम उत्खनन करण्याकरिता येथे परवानगी कशी मिळाली.
ठळक मुद्देउसर्रा-सालई शिवार : शासकीय व खासगी जमिनीचा समावेश