नाना पटोले यांचे आश्वासन : लवकरच होणार भूखंडाचे वाटपभंडारा : भंडारा तालुक्यातील सालेबर्डी (पांधी)या गावाचे पुनर्वसन शहापूर, मारेगाव - २ येथे प्रस्तावित असताना प्रकाशित एका खोट्या वृत्तामुळे प्रशासनाने पाठ फिरविली असून जिल्हा प्रशासनाने आयुक्त, (नागपूर) यांचे मार्फत प्रशासकीय मान्यतेकरिता सचिव मदत व पुनर्वसन, महसूल व वनविभाग महाराष्ट्र राज्य मुंबई येथे पाठविण्यात आला होता. गावातील नागरिक राजेश तितीरमारे, नजिर बांते, भाऊचंद घारगडे, सुदाम राखडे, मोहन तितीरमारे, चेतन श्राद्धे, उत्तम कांबळे, संतोष बान्ते, दयाळ घरडे, मधुकर बांते यांचे वतीने खासदार नाना पटोले यांना व आमदार रामचंद्र अवसरे यांना पुनर्वसन प्रकरण समजावून सांगण्यात आले. खासदार नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन, महसुल सुधीर मुनगंटीवार (मंत्री) वित्त आणि नियोजन वने गिरीश महाजन मंत्री जलसंपदा व लाभक्षेत्र विकास यांच्याकडे पाठपुरावा केला. लेखी स्वरुपातही शिफारशी दिल्या. मुख्यमंत्री यांचे शिफारशीने राजेश तितीरमारे, हेमंत बांडेबुचे, नंदू चौधरी, नजिर बान्ते, सचिव, मदत व पुनर्वसन महसूल व वन विभाग मंत्रालय यतांचेशी संपर्क साधून प्रशासकीय स्तरावर प्रकरण मार्गी लावण्यात आले आहे. काही कालावधीत जिल्हा प्रशासकीय स्तरावर नागरी सुविधा पूर्ण करून भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सालेबर्डी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 12:44 AM