शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

४१ हजार हेक्टरमधील रबी पिके धोक्यात

By admin | Published: January 03, 2016 1:06 AM

जिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली.

वातावरण बदलाचा फटका रबीची पेरणी ९१ टक्के, यावर्षी तीळ, लाखोळीचा पेरा वाढलादेवानंद नंदेश्वर भंडाराजिल्ह्यात आतापर्यंत ९१.८२ टक्के रबी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १२०.४१ टक्के लाखलाखोळी तर १३० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली. १०२ टक्क्यामध्ये हरभरा तर ७६.१७ टक्क्यांमध्ये गव्हाची पेरणी झालेली आहे. मात्र वातावरण बदलामुळे ४१ हजार हेक्टरमधील रबी पीके धोक्यात आले असून शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे कोठाराला खिंंड पडली. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची आस रबी पिकावर आहे. वातावरण बदलाचा फटका बसत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. यावर्षी कृषी विभागाने ४५,११५ हेक्टर क्षेत्र रबी पिकांसाठी निर्धारित केले आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ९१.८२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. ४१,४२४ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. आजपर्यंत गहू पिकाची ७६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. १० हजार ९९० हेक्टर क्षेत्र या पिकासाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ८,३७१ हेक्टर क्षेत्रात गहू, हरभरा ८,२३३.७० हेक्टर, लाखोळी ८,२३३, पोपट ८९५, वटाणा १,७३९, उडीद २,५६०, मुंग ३,०८६ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ६४.९४ आहे. जवस २,५१२, करडई ०.४०, मोहरी ७८, तीळ ३९ व इतर गळीत धान्य ४७.५० हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ज्वारी ४० हेक्टर, भाजीपाला २,२८९.४०, बटाटा १३४, मिरची ८६७ हेक्टर क्षेत्रामध्ये पीक लागवड करण्यात आली आहे. ही आकडेवारी ३० डिसेंबरची आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार, भंडारा तालुक्यात रबी पिकासाठी ८,६३० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी निर्धारित करण्यात आले. त्यापैकी ७,०९२ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आलेली आहे. पवनी तालुक्यात ८,९८० हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी ११,५२८, मोहाडी ५,७४० पैकी ४,३०२, तुमसर ४,६३५ हेक्टर क्षेत्रापैकी ३,७६३ हेक्टर क्षेत्रामध्ये रबीची लागवड करण्यात आली. साकोली तालुक्यात ४,३३० हेक्टर क्षेत्रापैकी २,८४२, लाखांदूर तालुक्यात ८,४५० हेक्टर क्षेत्रापैकी ७,०७० हेक्टरमध्ये, लाखनी तालुक्यात ४,३५० हेक्टर क्षेत्रापैकी ४,८२६ हेक्टर क्षेत्रात रबीची लागवड करण्यात आली. एकाही ठिकाणी सुर्यफुलाची लागवड करण्यात आली नाही. महिनाभरापासून वातावरण बदल असल्याने खरीप हंगामाप्रमाणे रबी हंगामात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून पीके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभागाने धीर देऊन त्यांना उपाययोजना सुचविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.