मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : दिवसागणिक पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत चालली. शेतीला सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवत होती. नेमकी हीच गोष्ट हेरून महाराष्ट्र शासनाने गावांगावात जलयुक्त शिवार योजना अंमलात आणून भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली. दिघोरीत केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा फायदा मिळाला असून रब्बी हंगामातील पिकपेरा दिडपटीने वाढण्यास मदत झाली.जलयुक्त शिवार योजनेत दिघोरीमध्ये १० विहीरींना पुर्नभरणाची सोय करण्यात आली. यामुळे बंद असलेल्या विहिरीत पुन्हा पाण्याचा स्त्रोत दिसू लागला. ३५ टक्के पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून येते.वनविभागामार्फत जंगलव्याप्त व गावाशेजारी १० साठवण तलावांची निर्मिती करण्यात आली. जवळपास २५ हेक्टर परिसरात खोलवर तयार करण्यात आले. यामुळे पावसाचे पाणी थेट नदी-नाले यामध्ये वाहून न जाता जमिनीत मुरते व उर्वरित पाणी साठवण तलावात जमा होते. यामुळे परिसरातील झाडे व पिकांना याचा फायदा झाला असून चोहीकडे हिरवी शाल पांघरल्याचा भास जलशिवार योजनेमुळे होत आहे.यापुर्वी तयार करण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांची नव्याने दुरूस्ती करून संपूर्ण लिकेज बंद करण्यात आला. यामुळे पावसाचे पाणी थेट वाहून न जाता बंधाºयात साचून राहिले. बंधाºयालगतच्या शेतकºयांना पावसाने दडी मारल्यावर पीक वाचविणे शक्य झाले. ज्या पिकाला एकही पाणी देणे शक्य नव्हते, त्या शेतकºयांनी बंधाºयामुळे दुबार पिक घेतले आहे.शेतात गहू, उडीद, मुंग, हरभरा, मोहरी, लाखोरी आदी पिकांची लागवड केल्याचे आढळून आले. यासोबतच जलयुक्त शिवार योजनेतून सात वन तलाव, तीन साठवण तलाव, लोकसहभागातून सात तलावातील गाळ काढण्यात आली. तीन तलावांचे खोलीकरण करण्यात आले. विभागीय कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी भेट देवून कामांचा आढाा घेतला. दिघोरीची निवड विभागीय जलयुक्त शिवार स्पर्धेसाठी झाले असल्याचे सांगितले. यावेळी अरुण गभने, रोहिदास देशमुख, शिंदे, निलेश गेडाम, काकडे, दसेरीया, वनक्षेत्राधिकारी दिघोरी, रंगारी, पी. येरणे, हेडाऊ, अशोक चुटे, रवी हटवार उपस्थित होते.दिघोरीत जलयुक्त शिवार योजनेचे सर्व कामे उत्कृष्ठपणे केल्या गेले आहेत. झालेल्या कामामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता आले. तसेच भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने दुबार पिक घेण्याची संधी दिघोरी वासीयांना प्राप्त झाली आहे. कृषी विभाग दिघोरीवासीयांसाठी जलसंधारणाचे फायदे पटवून देण्यासाठी जनजागृती करणार आहे.-निलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, लाखांदूर.
दिघोरी परिसरात रबी पिकांच्या लागवडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 1:00 AM
दिवसागणिक पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत चालली. शेतीला सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवत होती.
ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना ठरली वरदान : विभागीय आयुक्तांनी केली विविध कामांची पाहणी