शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे व बसस्थानके फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:13 PM

दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत.

ठळक मुद्देदिवाळीची चाहूल : रेल्वेगाड्यासुद्धा धावताहेत हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. रेल्वे स्टेशन व बस स्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी होत आहे. त्यानुसार एस.टी. प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांची व्यवस्थाही केली आहे.दिवाळीपूर्वी येणाºया व सण आटोपून परत जाणाºयांची संख्याही जास्त आहे. बाहेरगावाहून भंडारा येथे कामानिमित्त आलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागले आहे. मुलांच्या सत्र परीक्षाही संपल्या आहेत. दुसरीकडे दिवाळीनिमित्त शाळांना सुट्या लागल्या आहेत. परिणामी मागील तीन दिवसांपासून बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.सकाळपासून विविध मार्गावर जाणाºया बसेससाठी प्रवाशांचा ओघ सुरु होता. काही ठिकाणी तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. त्यातच काही बस उशीरा येत असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते.भंडारा बसस्थानकावरून अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा यासह जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागात जाणाºया गाड्यांमध्ये प्रवासी खच्चून बसल्याचे तथा उभे असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी हा मुख्य सण असल्याने गावाकडे जाणाºयांची संख्या या दिवसात वाढते. त्यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नेहमीपेक्षा रविवारपासून बसस्थानकावर गर्दी जास्त होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या भंडारा आगाराच्यावतीने जादा बस गाड्या सोडण्यात येत आहेत. गर्दीमुळे साहित्य व लहान मुलांना सांभाळताना प्रवाशांची कसरत होत आहे. ज्या मार्गावर अधिक गर्दी आहे तेथे रापच्यावतीने तातडीने बस उपलब्ध करून दिली जात आहे.रेल्वेगाड्याधावताहेत भरभरूनदिवाळीनिमित्त स्वगावी जाणाºया प्रवाशांमुळे प्रवाशी रेल्वेगाड्या भरभरून धावत आहेत. रविवारी (दि.१५) मुंबईवरून गोंदियाला येणाºया विदर्भ एक्स्प्रेसच्या साधारण डब्यांमध्ये प्रवाशांना पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांनी सामान्य तिकिट घेवून आरक्षित डब्यांतून प्रवास केल्याचे दिसले. त्यामुळे रेल्वे कर्मचाºयांनी त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपयांचा दंडही वसूल केला. प्रवाशांनीही सदर दंडाची रक्कम देवून आरक्षित डब्यांमध्येच बसून गोंदियापर्यंत प्रवास केला. सणासुदीच्या अशा गर्दीच्या परिस्थितीत रेल्वे कर्मचाºयांकडून प्रवाशांची लूट केली जात असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले आहे.