धनराज पुंडलिक नेवारे (२४) रा. तुमसर रोड (देव्हाडी) असे मृताचे नाव आहे. मुंबई -हावडा रेल्वे मार्गावर शुक्रवारी रात्री रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेतला होता. दरम्यान रेल्वे कर्मचारी तिथे तांत्रिक कामे करत होते. टीआरडी विभागाचा हेल्पर धनराज नेवारे काम करत असताना गोंदियावरून नागपूरकडे जाणाऱ्या हटिया एक्सप्रेसने जोरदार धडक दिली. या धडकेत धनराज फरफटत गेला. त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा होऊन तो जागीच ठार झाला. रेल्वे कर्मचारी विजय लिल्हारे यांनी रेल्वे सुरक्षा बल तुमसर पोलिसांना घटनेची माहिती दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख हरबंसी, गवळी व देव्हाडी पोलीस दूर केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभणे, पोलीस उपनिरीक्षक गोम लाडू, पोलीस शिपाई खराबे, जितू मल्होत्रा यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन कारवाई केली. धनराज नेवारे यांचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या दुर्दैवी मृत्युमुळे रेल्वे कर्मचाऱ्यात शोककळा पसरली.
हटिया एक्सप्रेसच्या धडकेत रेल्वे कर्मचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:37 AM