आॅनलाईन लोकमततुमसर : रेल्वे महाव्यवस्थापकांनी तुमसर रोडसह नागपूर विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांची बुधवारी पहाणी केली. माडगी (दे.) येथील वैनगंगा पुलाचे निरीक्षण केले. रेल्वे सध्या हायटेक होत आहे. रेल्वे सुरक्षा व सोयी सुविधा पुरविण्यासंदर्भात रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा होता. यावेळी स्थानिक पदाधिकाºयांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपस्थित होते.रेल्वे महाव्यवस्थापक एस.एस. स्वाईन यांनी बुधवारला तुमसर रोड रेल्वे स्थानकाला भेट दिली. रेल्वे स्थानक, रेल्वे सदनिका, रेल्वे पोलीस कार्यालय, स्टेशन मास्टर कार्यालय, तिकीट कार्यालय, रेल्वे दवाखाना, रनिंग रूम, रेल्वे उद्यानाची पहाणी केली. याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित अग्रवाल उपस्थित होते. स्थानिक शिष्टमंडळाने रेल्वे महाव्यवस्थापकांची भेट घेवून चर्चा केली. तुमसर रोड येथे फुटवे ब्रीज तयार करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात सरपंच रिना मसरके, उपसरपंच नवबशीने, रमेश थोटे, आलम खान, संजय तांबी, जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
रेल्वे महाव्यवस्थापकांनी केली रेल्वे स्थानक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 10:10 PM