भंडारा : सणासुदीचा काळ येताच प्रवासभाड्यात वाढ होणे अपेक्षित असते. कोरोनाच्या काळात रहदारी कमी असताना प्रवास भाडेही कमी झाले होते. दरम्यान, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर सर्वच ठिकाणी आवागमन वाढले आहे. तसेच राखी पौर्णिमेचा काळ बघता रेल्वेचे आरक्षणही हाऊसफुल्ल होत आहे.
कोरोनामुळे गत दीड वर्षापासून रेल्वे, एस. टी. व खासगी ट्रॅव्हल्स सेवेला ग्रहण लागले होते. आता परिस्थिती फार बदललेली आहे. अवघ्या महिनाभरातच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात भंडारा जिल्ह्यातील वरठी रोड रेल्वेस्थानकातूनही आरक्षणाची गती थोडी फार वाढल्याचे दिसून येते, अशीच अवस्था तुमसर जंक्शन स्थानकावर पाहायला मिळत आहे.
बॉक्स
या गाड्यांना वेटिंग
गोंदिया-मुंबई-विदर्भ एक्सप्रेस
गोंदिया-कोल्हापूर विदर्भ एक्सप्रेस
मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
पुरी-निजामुद्दीन एक्सप्रेस-अहमदाबाद एक्सप्रेस
बॉक्स
५० टक्के प्रवासी संख्या वाढली
कोरोना महामारीमुळे रेल्वेची थांबलेली चाके पुन्हा धावायला लागली आहेत. आता तर आरक्षण फुल्ल झाल्याने प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
यात विशेषत: भंडारा रोड रेल्वे स्थानकातून विदर्भ एक्सप्रेस, समता एक्सप्रेस, आदी रेल्वेगाड्यांचे आवागमन सुरू असून, यामध्येही प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. परिस्थितीनुसार यात बदल होईल.