लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीलपासूनच पावसाने वेळोवेळी समाधानकारक हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने जुलै महिन्यात शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले. भरघोस उत्पन्नाच्या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या धानरोवणीला रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने कायमच दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे धानशेतीला भेगा पडल्या असून धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. या परिसरात सद्यस्थितीत दमदार पावसाची गरज असून येत्या पाच दिवसात पाऊस न झाल्यास धान उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सद्यस्थितीत या परिसरावर दुष्काळाची छाया पसरली आहे.या परिसरातून गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या अनेक वितरिका वाहात आहेत. मात्र, या वितरिकांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले नाही. परिणामी या वितरिकांमधील पाण्यासाठी शेतकºयांमध्ये भांडणे होऊ लागली आहेत. दरम्यान शेतकरीवर्ग रात्री बेरात्री आटापीटा करून परिसरातील नाल्यांवर आणि वितरिकांवर मोटारपंप इंजिन लावून आपल्या धानशेतीची तहाण भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, डाव्या कालव्याच्या या वितरिकांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.भारनियमणाने वाढविली डोकेदुखीसध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत १६ तासांचे भारनियमन सुरू असून शेतीला केवळ आठ तास विद्युत पुरवठा केला जातो. या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारपंपधारक शेतकरी आहेत. मात्र, विहिरींची पाण्याची पातळी अद्याप वाढली नसल्याने या विहिरींमधून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होणे अशक्य आहे. त्यातच विद्युत वितरण कंपनी रात्री ९ ते १२ च्या दरम्यान शेतीसाठी विद्युत पुरवठा सुरू करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतावर ये-जा करावी लागते. या धावपळीत साप, विंचू आणि अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका पोहचू शकतो. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान शेतीसाठी विज पुरवठा सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
पावसाने पाठ फिरविली, धानशेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:15 PM
गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत.
ठळक मुद्देयंदाही दुष्काळच सांगाती : शेतातील भेगांनी बळीराजाचे काळीज फाटले