जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी १३३.२ मिमी आहे. १ जून ते २४ जुलै या कालावधीत ५३८.६ मिमी पाऊस अपेक्षित असताे. जिल्ह्यात २४ जुलैपर्यंत ५३२.४ मिमी म्हणजे सरासरीच्या ९९ टक्के पाऊस काेसळला. परंतु हा पाऊस अगदी सुरुवातीच्या काळातील आहे. गत तीन दिवसातील आकडेवारी बघितली तर शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसत आहे. २४ जुलै राेजी जिल्ह्यात १.८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. २३ जुलै राेजी २५.८ मिमी, २२ जुलै राेजी ४०.६ मिमी, २१ जुलै राेजी १४.७ मिमी अशी पावसाची नाेंद झाली आहे. या चार दिवसात जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस काेसळला नाही. त्यामुळे राेवणी रखडलेली आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात केवळ २५ टक्के क्षेत्रावर राेवणी
भंडारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या नियाेजनानुसार एक लाख ६१ हजार ४९३ हेक्टरवर धान पीक घेतले जाणार आहे. आतापर्यंत सुमारे ४५ हजार हेक्टरवरच राेवणी झाली आहे. साधारणत: २५ टक्के राेवणी आटाेपली आहे. अद्यापही माेठ्या प्रमाणात राेवणी रखडल्याचे दिसून येत आहे. यामागचे कारण म्हणजे गत दाेन आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊसच झाला नाही. गत तीन दिवस काेसळलेल्या पावसाने केवळ पऱ्ह्यांना आणि रोवणीला जीवनदान दिले आहे. मात्र आता शेतकरी किती दिवस पऱ्हे नर्सरीत ठेवायचे असे म्हणत राेवणीची गडबड करीत आहे.
बाॅक्स
तालुकानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस
तालुका पाऊस टक्केवारी
भंडारा ४१६.९ मिमी ८१
माेहाडी ६४४.१ मिमी १२४
तुमसर ४५७.९ मिमी ८९
पवनी ५३६.३ मिमी ११२
साकाेली ५२०.६ मिमी ९६
लाखांदूर ५७७.६ मिमी ९६
लाखनी ५७३.१ मिमी ९६
एकूण ५३२.४ मिमी ९९