शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
2
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
3
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
4
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
5
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
6
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
7
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
8
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
9
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
10
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
11
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
12
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
13
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
14
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
15
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
16
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
17
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
18
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
19
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
20
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

पालांदूर, आसगाव परिसरात अवकाळी पाऊस

By admin | Published: March 15, 2016 1:08 AM

दुष्काळात तेरावा महिना म्हणत रविवारी अचानक मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह

पालांदूर : दुष्काळात तेरावा महिना म्हणत रविवारी अचानक मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने पालांदूर परिसरात जोरदार हजेरी लावली. परिसरात ४७.६ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. जीव धोक्यात घालून शेतमालांची जपवणूक करण्याकरिता धावपळ केली. हलक्या स्वरुपाची गारपीट झाली. परंतु नुकसान समजले नाही. गहू व चना पिकाला सुमार नुकसानीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वादळी पाऊस व गारपीट अपेक्षितच होती. बागायतीमध्ये वांगा पिकाला झोडपले असून शेतात पाणी साचले आहे. यामुळे बुरशीजन्य रोगाचा त्रास वाढणार हे निश्चित आहे. फुलकोबी खराब झाली असून भावात नुकसान सहन करावे लागणार आहे. कोरडवाहू शेतीला या पावसाने पोषकता दिली असून खरीपाची तयारी करण्याकरिता सकारात्मकता मिळाली आहे. पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले जाते. महाशिवरात्री ते होळीच्या दरम्यान वातावरणात बदल अपेक्षित दिसतो. दोन वर्षापूर्वी खराशी, खुनारी, लोहारा, मचारणा, दिघोरी, पळसगाव आदी गावांना गारपिटीचा जबर दणका बसून घरांचे व शेतमालांचे प्रचंड नुकसान झाले होते. आसगावात वादळी पाऊसआसगाव: पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसाने गव्हाचे नुकसान केले आहे. दुसरीकडे मळणीची कामे खोळंबली आहेत.सानगडी परिसरात वादळी पाऊस गारांसहसाकोली/सानगडी : सानगडी परिसरात सासरा, विहिरगाव (बु.), कटंगधरा, सालेबर्डी, सानगाव, शिवणीबांध, झाडगाव, सिरेगाव (बांध), सोमानपूर, गुढरी टोला आदी गावांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मेघ गर्जनेसह वादळी पाऊस बरसला. यात १६.१ मि.मी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तूर, हरभरा, गहू, उळीद, लाखोरी, मिरची व भाजीपाला वादळामुळे भुईसपाट झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून नेला. परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे की नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)पावसाचा कांदा उत्पादनाला फटका४चिचाळ : चिचाळ येथे गेल्या ५ ते ६ वर्षापासून येथील कांद्याची मागणी जिल्ह्याशिवाय पर जिल्ह्यातही वाढल्याने व कांदा पीक हे नगदी पीक असल्याने या वर्षाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र काल रात्री वादळी पावसाने झोडपल्याने शेतात पाणी साचल्याने कांदा उत्पादक संकटात सापडला आहे. मागील वर्षी चिचाळ येथील कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना नेहमीपेक्षा जास्त नफा मिळाला. त्यामुळे यावर्षी अनेक शेतकरी कांदा उत्पादनाकडे वळले असून अंदाजे ७०० एकरामध्ये कांद्याची लागवड केली आहे.पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मुख्यत: धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. तसेच धान निघाल्यानंतर रब्बी पीक म्हणून गहू, हरभरा, वाटाणा, लाख, उळीद, मुग आदी पीके घेतली जात होती. ज्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी उन्हाळी धान पीक घेत होते. परंतु धानावर येणारी कीड, महागडे रासायनिक खताचे भाव व धानाला नसलेला भाव यामुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु कांदा या पिकाला धानापेक्षा पाणी व खर्च कमी लागत असल्यामुळे चिचाळ येथील शेतकरी कांदा उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. चिचाळ परिसरात २८.२ मि.मी पाऊस बरसला.४कांदा उत्पादन होत असले तरी शेतकऱ्यांना मात्र त्यांचेकडे किंवा शासकीय गोदाम उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावात व्यापाऱ्याला विकावा लागतो हे व्यापारी कांदा दुप्पट, तिप्पट भावाने विकून नफा कमावित असतात. परंतु या भागात कांदा साठवणूकगृहाची निर्मिती झाल्यास शेतकऱ्यांना व ग्राहकांना त्यांचा फायदा होऊ शकतो. परंतु राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने कोणताही राजकारणी पुढाकार घेताना दिसत नाही. काल रात्री झालेल्या अकाली वादळी पावसाने कांद्याच्या वाफ्यात पाणी साचून कांद्याची पाल जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात येणारी उत्पन्न ऐन वेळेवर पावसाने हिसकावली तर शेतातील गहू, हरभरा, वाटाणा, उळीद, मुग, चना, लाख आदी रब्बी पिकांच्या कळपा व गंज्या पाण्यात सापडल्याने संपूर्ण फसल मातीमोल झाली आहे. शासनाने व स्थानिक जि.प. सदस्यांनी सदर परिसराची चौकशी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. ४या संदर्भात कृषी सहाय्यक एकनाथ पाखमोडे यांचेशी संपर्क साधला असता राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेअंतर्गत कांदा साठवणूकगृह ही शासनाची ४० हजार रुपयाची योजना असून ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिला जातो. यासाठी सातबारा, गाव नमुना, आठ अ, नकाशा रेकॉर्डला कांदा लागवड क्षेत्राची नोंद असलेला सातबारा, बँक पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इत्यादी कागदपत्रांची पूर्तता केल्यास शेतकऱ्यांना कांदा साठवणूकगृह उपलब्ध होऊ शकते.