लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील तीनदिवसांपासून जिल्ह्यात सुसाट वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवसा ऊन तर सायंकाळी पाऊस असा स्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस बरसल्याचेही प्राथमिक माहिती आहे.परिणामी ऐन रबी हंगामाच्या अंतिम टप्प्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. गहू कापणीचा हंगाम तोंडावर असतांना या पावसामुळे हातचे पिक तर जाणार नाही अशी भितीही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. वातावरणात अचानकपणे होत असलेल्या बदलावामुळे संसर्गजन्य आजारही बळावत असून खाजगी रुग्णालयसह सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे.मासळ : काल रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास मासळ, बेलाटी, खैरी, घरतोडा परिसरात मेघगर्जनेसह गारांसह जोरदार पाऊस पडला सुमारे तासभर पावसाने वादळासहीत झोडपले. दिवसभर ऊन होती पण सायंकाळी अधूनमधुन ढग यायला सुरुवात झाली व रात्री वादळासह जोराचा पाऊस झाला. ह्या अवकाळी पावसाने जरी शेतकऱ्यांना नुकसान झाला नसला तरी बेमोसमी पावसाने जनसामान्याची चिंता वाढली आहे. भर उन्हाळ्यात जोराचा पाऊस आल्याने पावसाळ्यात मात्र निसर्गराजा दगा देईल काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. या अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाचे चटके कमी झाले आहेत. रब्बी पिके जवळपास काढून झाल्याने या पावसाचा खुप जास्त विपरित परिणाम झालेला नाही.पालांदूर : दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने पालांदूर परिसरात जोरदार हजेरी लावली. यापावसामुळे आठवडी बाजारावर परिणाम जाणवला. भाजीपाला उत्पादकांनाही याचा फटका बसला आहे. सुसाट वाºयामुळे रात्रभर विज पुरवठाही बंद असल्याने नागरिकांना गैरसोयीचा फटका सहन करावा लागला.लाखांदुर : तालुक्यात तिन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, शनिवारी (ता.१४) सायंकाळी वादळी वारे, धुळीचे लोट, गारपीट अन् अवकाळी पाऊस असे चित्र होते. दिघोरी/मो, मासळ, सोनी, मोहरणा, सरांडी/बु, विहीरगाव, बारव्हा यासह तालुक्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांची तारांबळ उडाली. सायंकाळी सहाच्या सुमारास तिन तास मेघगर्जनेसह पाऊस झाला.संपूर्ण तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. वाºयामुळे अनेक भागांत पत्रे उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळली. लाखांदुर शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह वादळी वाº्याला सुरवात झाली. त्यामुळे सर्वत्र धुळीचे प्रचंड लोट उठले होते.जागोजागी साचलेला कचराही विखुरला. वेगवान वादळी वाऱ्याने काही काळ वाहतुक ठप्प राहिली. या वातावरणामुळे आंबा, कांदा, धान बियाणे आदींचे नुकसान झाले. हळदीचे पिक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. ईटान, भागडी, मांढळ, दांडेगाव, खैरी/पट, बोथली, कुडेगाव, गवराळा, डांभेविरली येथे विट भट्टी असून कच्च्या विटांवर पाणी गेल्याने विटा जिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. तर खोलमारा येथे मोठ्या प्रमाणावर बागायती शेती केली जात असून, कारले, चवळी या पिकांची बाग वादळी वाºयासह गारपिटीने उद्ध्वस्त झाली आहे.फेब्रुवारी महिन्यात तालुक्यात गारपिटीने कहर केला होता. त्यात कडधान्याचे मोठे नुकसान होऊन उत्पन्न कमी आले होते. त्यानंतर आता पुन्हा गारपिटीने झोडपले आहे. शनिवारी दुपारनंतर तालुक्यात सर्वञ ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. गारपिटीच्या तडाख्यात बाजार समितीमधील शेतमाल सापडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:34 PM
मागील तीनदिवसांपासून जिल्ह्यात सुसाट वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवसा ऊन तर सायंकाळी पाऊस असा स्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस बरसल्याचेही प्राथमिक माहिती आहे.
ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यात गारपीट : दिवसा उन्हाचे चटके तर सायंकाळी गारवा, आजाराला मिळतेय खतपाणी