लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : राहायला घर नसल्याने एका बहुरूपी कुटुंबाने चार महिन्यापुर्वी वनजमीनीवर झोपडी उभारली. आपल्या पत्नी व चार मुलांसह तेथे राहू लागला. मात्र वनविभागाने शुक्रवारी अतिक्रमण हटावच्या नावाखाली झोपडी उध्वस्त केली. भर पावसाळ्यात कुटंब उघड्यावर आले. हा प्रकार तालुक्यातील कन्हाळगाव येथे घडला.विविध रूप घेवून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या जयेंद्र रमेश तिवसकर (३५) या तरूणाकडे स्वत:चे घर नाही. त्यामुळे त्याने कन्हाळगाव येथे वनविभागाच्या जमिनीवर छोटीशी झोपडी उभारली. यात पत्नी आरती, मुली कुमारी, दिव्या, अश्विनी आणि मुलगा प्रेम या चार अपत्यासह राहू लागला. गावोगावी भटकंती करून उदरनिर्वाह सुरू होता. परंतु लॉकडाऊनने त्याच्यावरही उपासमारीची वेळ आणली. अशातच तो कसाबसा जीवन जगत असताना शुक्रवारी वनविभागाचे पथक त्याठिकाणी धडकले. तात्काळ सूचनापत्र देवून दुपारी २ वाजताच्या सुमारास त्याची झोपडी उध्वस्त करण्यात आली. भांडी, कुंडी, अन्नधान्य व कपडेलत्ते उघड्यावर आले. उध्वस्त झालेल्या झोपडीवर बसून कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत होते. परंतु कुणालाही दया आली नाही. आता पावसाळ्यात निवारा कुठे शोधावा, असा प्रश्न जयेंद्र तिवसकर याच्यापुढे निर्माण झाला आहे.जयेंद्र तिवसकर यांनी कक्ष क्रमांक ३२० व गट क्रमांक ७ कन्हाळगावमध्ये संरक्षित वनजमिनीवर झोपडी बांधून अतिक्रमण केले होते. ते कुटुंबासह तेथे राहत होते. शुक्रवारी लाखांदूरच्या वनकर्मचाºयासह घटनास्थळी जावून संबंधित कुटुंबाच्या संमतीनेच अतिक्रमण हटविण्यात आले.- अनिल शेलार, वनपरिक्षेत्राधिकारी, लाखांदूर.
भरपावसाळ्यात बहुरूपी कुटुंबाला केले बेघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 5:00 AM
विविध रूप घेवून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या जयेंद्र रमेश तिवसकर (३५) या तरूणाकडे स्वत:चे घर नाही. त्यामुळे त्याने कन्हाळगाव येथे वनविभागाच्या जमिनीवर छोटीशी झोपडी उभारली. यात पत्नी आरती, मुली कुमारी, दिव्या, अश्विनी आणि मुलगा प्रेम या चार अपत्यासह राहू लागला. गावोगावी भटकंती करून उदरनिर्वाह सुरू होता. परंतु लॉकडाऊनने त्याच्यावरही उपासमारीची वेळ आणली.
ठळक मुद्देकन्हाळगाव येथील प्रकार : अतिक्रमण हटावच्या नावाखाली वनविभागाची कारवाई