शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

पावसाची आश्वासक हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:20 PM

आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आज झालेल्या पावसाने आशा पल्लवीत झाल्या. भंडारा, मोहाडी, लाखनी तालुक्यास जिल्ह्यातील अनेक गावात शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस नसला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांची असाह्य उकाड्यातून सुटका झाली. तर मोहाडी आणि लाखनी तालुक्यात वीज कोसळून सात जनावरे ठार झाली.

ठळक मुद्देअर्धा तास बरसला : मोहाडी आणि लाखनी तालुक्यात वीज पडून सात जनावरे ठार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आज झालेल्या पावसाने आशा पल्लवीत झाल्या. भंडारा, मोहाडी, लाखनी तालुक्यास जिल्ह्यातील अनेक गावात शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस नसला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांची असाह्य उकाड्यातून सुटका झाली. तर मोहाडी आणि लाखनी तालुक्यात वीज कोसळून सात जनावरे ठार झाली.जिल्ह्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरणीची कामे ठप्प झाली होती. दरम्यान हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात तुरळक पावसाला प्रारंभ झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आकाशात काळेकुट्ट ढग आले. विजांच्या कडकडाटासह पावसाला प्रारंभ झाला. भंडारा शहरात दुपारी २.१५ वाजता जोरदार पावसाला प्रारंभ झाला. अर्धा तास बरसलेल्या या पावसाने रस्त्यावर पाणी वाहून गेले. गुरूवारी पहाटे भंडारा शहरात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. मात्र त्यानंतर प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. शुक्रवारी झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. मोहाडी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. या तालुक्यात वीज कोसळून पाच जनावरे ठार झाली. रोहणा परिसरात एक गाय तर खोडगाव येथे एक म्हैस आणि वगार तर पारडी येथे प्रेमलाल झंझाड यांच्या मालकीच्या दोन म्हशी ठार झाल्या. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात मºहेगाव येथे गाय आणि कालवट ठार झाली. भंडारा तालुक्यातील शहापूर, पवनी तालुक्यातील मासळ परिसरातही दुपारी पावसाने हजेरी लावली. पालांदूर परिसरात या हंगामातील पहिलाच पाऊस कोसळला. कोंढा कोसरा परिसरात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. शेतकºयांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकºयांनी आपल्या शेतात पºहे टाकले आहे. पºहे रोवणीयोग्य झाले असले तरी पाऊस नसल्याने कामे ठप्प झाली आहे. एकदा दमदार पाऊस बरसतो आणि रोवणीला सुरूवात होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यात केवळ २८ मिमी पाऊसभंडारा जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यात केवळ २८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते २८ जून या कालावधीत १८२.६ मिमी पावसाची सरासरी आहे. मात्र आतापर्यंत केवळ २८ मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत १४५.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. भंडारा तालुक्यात आतापर्यंत ६०.६ मिमी, मोहाडी ४६.४ मिमी, तुमसर ४९ मिमी, साकोली ४.६ मिमी, लाखनी ३५.२ मिमी पावसाची नोंद झाली तर गत २४ तासात जिल्ह्यात ४.८ मिमी पाऊस कोसळला.पवनी, लाखांदूर तालुके निरंकजिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली असली तरी पवनी आणि लाखांदूर तालुक्यात अद्यापही पाऊस कोसळला नाही. या तालुक्यात पावसाची नोंद निरंक आहे. आकाशात ढग येतात. मात्र निघून जातात. या दोन तालुक्यावर वरूणराजा रूसल्याचे दिसत आहे.