भंडारा : लाखनी तालुक्यातील सिंधीपार येथे राजाभोज जयंतीचे आयोजन पाेवार समाज संघटनेच्यावतीने शुक्रवारी करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष कैलास भगत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विकास पटले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच धनंजय ठाकरे, रामेश्वर बिसने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, नूतन ठाकरे, सरपंच मीनाक्षी बोपचे, सरपंच सुरेखा पारधीकर, पंचायत समिती उपसभापती मोरेश्वरी पटले उपस्थित होते. यावेळी बोलताना कैलास भगत म्हणाले, पोवार समाजाने संघटित होऊन विकास कामे करावी. समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला माजी सरपंच माया अंबुले, पोलीस पाटील येळेकर, दशरथ येळेकर, अशोक पटले, प्रदीप रहांगडाले, ज्ञानेश्वर येळेकर, दिलेश येळेकर, चिरंजीव येळेकर, पुष्पलता सोनवने यांच्यासह आतेगाव, सालेभाटा, मासलमेटा, किन्ही, पळसपाणी, राजेगाव, मोरगाव येथील समाज बांधव उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रामू येळेकर, सतीष बिसने, निकेश येळेकर, जागेश्वर येळेकर, भारत येळेकर, पालिक बिसने, शिवराम बघेले यांनी सहकार्य केले.