लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण आहे. परंतु, या सणाची जय्यत तयारी जिल्हा पोस्ट विभागाने केली आहे. लाडक्या बहिणींच्या राख्या सुरक्षितरीत्या, ओल्या न होता भाऊरायापर्यंत पोहोचाव्यात यासाठी खास आकर्षक असे वॉटरप्रूफ पाकिटे तयार केली आहेत. जिल्हा पोस्ट विभागात जवळपास २००० पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. आणखी ५०० पाकिटे मागविण्यात आली आहेत.
भावा-बहिणींच्या अतुट प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन सणाकडे पाहिजे जाते. हा सण दूरवर असलेल्या बहीण-भावांमुळे अडचणीत सापडू नये, बहिणींचे प्रेम भावांपर्यंत राखीच्या स्वरूपात सुरक्षित पोहोचावे, यासाठी जिल्हा पोस्ट विभाग कटिबद्ध आहे. रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी तसेच बाहेरगावी राहत असलेल्या भावाला राखी पाठविण्यासाठी डाक विभागाने खास आकर्षक डिझाइनमध्ये व वॉटरप्रूफ असलेले पाकीट उपलब्ध केले आहेत. या पाकिटातून पोस्टाद्वारे पाठवल्या जाणाऱ्या राख्यांसाठी स्वतंत्र सेवा डाक विभागाकडून राबवली जात आहे
रक्षाबंधन सणानिमित्त ज्या बहिणीला भावाकडे अथवा भावाला बहिणीकडे प्रत्यक्ष जाता येत नाही, त्यांच्यासाठी डाक विभागाने वॉटरप्रूफ व खास रक्षाबंधनाचे डिझाइन असलेले पाकीट तयार केले आहे राख्या सुरक्षित व वेळेत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र शॉटिंग, पॅकिंग व ते वेळेत पोहोचविण्यासाठी यंत्रणा कार्यरत राहणार आहे. पोस्ट विभागाच्या वतीने रक्षाबंधन सणानिमित्त पूर्ण तयारी करण्यात आली आहे
गतवर्षी १० रुपयांत १२३१ पाकिटांची विक्रीरक्षाबंधनसाठी राखी कव्हरची खास सुविधा पोस्ट विभागात उपलब्ध आहे. यामध्ये वेगवेगळ्ळ्या प्रकारच्या व रंगाच्या आकर्षक राखी कव्हर जिल्ह्यातील डाक विभागांच्या कार्यालयांत उपलब्ध आहेत. पाकीट वॉटरप्रूफ असल्याने राखी खराब होण्याचा धोका यामुळे नसणार आहे. गतवर्षी केवळ १० रुपयांत १२३१ पाकिटांची विक्री करण्यात आली होती.
स्पीड, साधे व रजिस्टर पोस्ट सुविधालाडक्या बहिणींच्या राख्या वेळेत व सुरक्षितरित्या भावापर्यंत पोहोचाव्या यासाठी पोस्ट विभागाच्या स्पीड, साधे व रजिस्टर पोस्ट सेवा उपलब्ध राहतील. डाक विभागाकडून रक्षाबंधनासाठी २००० पाकिटे उपलब्ध करण्यात आली आहेत.
१८ विभागांना १५०० पाकिटे पाठविलीजिल्हा पोस्ट विभागाने ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने ग्रामीण भागातील १८ उपविभागांना १५०० पाकिटे पाठविण्यात आली आहेत. तर जिल्हा कार्यालयात ५०० पाकिटे उपलब्ध राहणार आहेत. एका पाकिटाची किंमत १२ रुपये राहणार आहे.
"जिल्हा पोस्ट विभागात २००० वॉटरप्रूफ पाकिटे उपलब्ध आहेत. आणखी ५०० पाकिटे मागविण्यात आली आहेत. एका पाकीटिची किंमत १२ रुपये असणार आहेत. लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घ्यावा, भावांपर्यंत सुरक्षित व ओल्या न करता राख्या पोहोचविण्याची जबाबदारी पोस्ट विभागाची राहील."-शंकर निंबातें, जिल्हा पोस्ट मास्तर, भंडारा
राख्यांच्या पाकिटावर जीएसटीचा भुर्दंडगतवर्षी जीएसटीसह पाकिटाची किंमत १० रुपये होती. यंदा २ रुपये जीएस- टीसह पाकीट किमत १२ रुपयांना राहणार आहे. परंतु, योजना राबविताना जीएसटी कर आकारला जाऊ नये, अशी अपेक्षा बहिणींकडून व्यक्त होत आहे.