शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

जिल्ह्यात रामनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:21 PM

हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव रविवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाई, ढोलताशांचा लयबद्ध गजर, देखावे आणि शोभायात्रा पाहण्यासाठी लाखोंचा उसळलेला जनसमुदाय हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. ‘श्रीराम रामे मनोरमे’ असे वातावरण निर्माण होवून प्रभू रामचंद्रांच्या नावाचा गजर करण्यात आला.

ठळक मुद्देभव्य मिरवणूक : भगव्या पताकांसह आर्कषक रोषणाई

आॅनलाईन लोकमतभंडारा : हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव रविवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाई, ढोलताशांचा लयबद्ध गजर, देखावे आणि शोभायात्रा पाहण्यासाठी लाखोंचा उसळलेला जनसमुदाय हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. ‘श्रीराम रामे मनोरमे’ असे वातावरण निर्माण होवून प्रभू रामचंद्रांच्या नावाचा गजर करण्यात आला.रविवारी दुपारी १२ वाजता श्री बहिरंगेश्वर देवस्थान तथा मोठा बाजार परिसरातील श्रीराम मंदिरात श्रीरामजन्मोत्सव सोहळा पार पडला. यापूर्वी भजन, कीर्तन रामजन्म कार्यक्रम, आरती व प्रसाद वितरीत करण्यात आला.सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सजविलेल्या आकर्षक रथातून प्रभू रामचंद्र, माता सीता व प्रभू लक्ष्मण यांच्या मूर्र्तींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत विविध मंडळाचे देखावे, झाकी साकारण्यात आली होती.अतिथींच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, राष्टÑवादीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष संजय कुंभलकर, जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, नितीन धकाते, मंगेश वंजारी, नितीन दुरगकर, रिंकू शर्मा, पंडित शिवा चेपे, यासह शेकडो भाविक उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर वाखाणण्याजोगा होता. तरूणांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.आस्थेचे दर्शन घडविणारी 'रामजन्मोत्सव' शोभायात्रातुमसर : रामजन्माष्टमीच्या निमित्ताने तुमसर शहरात आस्थेचे दर्शन घडविणारी भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली. लोकनृत्यापासुन भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता व हनुमान यांच्या प्रतीकृतीसह शोभायात्रेत महादेवाचे तांडव नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युध्दचालीची प्रतीकृती अशा अनेक लोक कलाकृतींचा समावेश असलेली शोभायात्रा तुमसर शहरातून काढण्यात आली. शोभायात्रेत वेगवेगळ्या धार्मिक संस्थांमार्फत आपआपल्या परीने तंत्रज्ञानाचा वापर करुन चल प्रतीकृती सादर करण्यात आल्या.तुमसर नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रदिप पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामांच्या प्रतीकृतीचे पुजन करुन शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर जगदीश कारेमोरे, तारीक कुरैशी, कल्याणी भुरे, पंकज कारेमोरे, सुनिल पारधी, श्याम धुर्वे, योगेश सिंगनजुडे, अमर रगडे, अनिल जिभकाटे, सचिन बोपचे व हजारोंच्या संख्येत भाविक महीला - पुरुष व लहान बालके उपस्थित होती.