शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जिल्ह्यात भात रोवणी केवळ चार टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:55 AM

हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत.

ठळक मुद्देअपुरा पाऊस : सात हजार २७५ हेक्टरवर रोवणी

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत. रोवणी लांबल्यास याचा परिणाम भात उत्पादनावर होणार हे निश्चीतच.भंडारा जिल्ह्यात दोन लाख ३ हजार ६१६ हेक्टरवर खरीप हंगामात नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ८० हजार १२५ हेक्टर भाताचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे पºहे टाकण्यास शेतकऱ्यांना उशिर झाला. आद्रा नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. परंतु तोही पुरेसा नाही. १ जून ते ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३५३ मिमी पाऊस अपेक्षीत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३९.८ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्याच्या तिसºया आठवड्यात तर भंडारा, पवनी तालुक्यात पाऊसच कोसळला नव्हता. परिणामी शेतीची सर्व कामे खोळंबली. गत आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. मात्र हा ही पाऊस भात रोवणीसाठी योग्य जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भात रोवणीचे कामे खोळंबली आहे.भंडारा जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टरपैकी केवळ ७ हजार २७५ हेक्टरवरच भाताची रोवणी झाली आहे. केवळ ३.८७ टक्के रोवणी झाल्याचा नजर अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यात तुरीची पेरणी ११ हजार २२ हेक्टरवर केली जाते. आतापर्यंत ९१६ हेक्टरवरच पेरणी आटोपली होती.जिल्ह्यात अद्यापही कोणत्याही नदी-नाल्याला पुर गेला नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. शेतात चिखलनी योग्य पाऊस झाला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. रोवणी लांबल्यास भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.लाखांदूरमध्ये सर्वाधिक रोवणीभंडारा जिल्ह्यात सर्वाधिक रोवणी लाखांदूर तालुक्यात ८.८८ टक्के झाली आहे. २९ हजार ८६३ हेक्टर क्षेत्रापैकी २ हजार ६५१ हेक्टरवर भाताची रोवणी आटोपली आहे. सर्वात कमी रोवणी भंडारा तालुक्यात झाली असून येथे १.६१ टक्केच रोवणी झाली आहे. भंडारा तालुक्यातील २५ हजार ८३२ हेक्टर क्षेत्रात भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून केवळ ४१५ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे.२५०० हेक्टरवर तूरभंडारा जिल्ह्यात भातासोबतच तुरीची लागवड केली जाते. ७०६९ हेक्टरवर तुर लागवडीचे नियोजन असून आतापर्यंत २५७९ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. ३६.४८ टक्के क्षेत्रात लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड तुमसर तालुक्यातील ७४ टक्के झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

टॅग्स :agricultureशेती