शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:34 AM

भंडारा : एप्रिल महिन्यातील कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने भयभीत झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मे महिन्यात मोठा दिलासा मिळत आहे. १ मे ...

भंडारा : एप्रिल महिन्यातील कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने भयभीत झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मे महिन्यात मोठा दिलासा मिळत आहे. १ मे पासून रुग्णांची संख्या सातत्याने घटत असल्याचे दिसत आहे. एप्रिलच्या १२ तारखेला १५९६ उच्चांकी पाॅझिटिव्ह रुग्ण आले होते, तर शनिवारी जिल्ह्यात १७१ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून मृत्यूचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसत आहे.

भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला होता. एप्रिल महिन्यात सर्वाधिक ३३ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी अर्धे अधिक मृत्यू एप्रिल महिन्यातच झाले होते. रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडू लागल्या होत्या. ऑक्सिजनही मिळत नव्हते. अशा स्थितीत मे महिना उजाडला आणि रुग्णांची संख्या वेगाने कमी व्हायला लागली.

१ मे रोजी जिल्ह्यात ६८५ रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. तेव्हापासून सातत्याने रुग्णसंख्या कमी होत आहे. २ मे रोजी ६१५, ३ मे ५५०, ४ मे ५७३, ५ मे ५७८, ६ मे ५२७, ७ मे ७३१, ८ मे ५४८, ९ मे ४११, १० मे २३९, ११ मे २१७, १२ मे ३०९, १३ मे २१८ आणि १४ मे रोजी १००, तर शनिवारी १७१ रुग्णांची नोंद करण्यात आली. पाॅझिटिव्हिटी दरही कमी होत आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात १२ तारखेला १५९६ उच्चांकी रुग्ण आढळून आले होते. १४ एप्रिल रोजी १४७८ आणि १६ एप्रिल रोजी १३९७ रुग्णांची नोंद झाली होती.

जिल्ह्यात आतापर्यंत १०१६ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यातील अर्धेअधिक मृत्यू एकट्या एप्रिल महिन्यातील आहेत. गावागावांत मृत्यूचे तांडव सुरू होते. गराडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यात ४७९, मोहाडी ९१, तुमसर ११०, पवनी १००, लाखनी ८८, साकोली ९, लाखांदूर ४८ व्यक्तींचा समावेश आहे.

बाॅक्स

शनिवारी जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात शनिवारी १२३५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १७१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. भंडारा तालुक्यात ५०, मोहाडी ६, तुमसर ८, पवनी ३, लाखनी ५१, साकोली ३८ आणि लाखांदुरमध्ये १५ रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात भंडारा तालुक्यातील ४ व्यक्ती आहेत. तुमसर तालुक्यातील २ आणि साकोली तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार १७६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी ५२ हजार ७४५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.

बाॅक्स

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३४३५

जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ हजारापर्यंत गत महिन्यात पोहोचली होती. आता ती ३४३५ पर्यंत आली आहे. तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण पुढीलप्रमाणे. भंडारा ९५१, मोहाडी १४५, तुमसर ३१९, पवनी २३३, लाखनी ४८९, साकोली ११३७, लाखांदूर १४१ व्यक्तींचा समावेश आहे.