५० प्रशिक्षणार्थी उपस्थित : अभयसिंह परिहार यांचे प्रतिपादनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जलद गतीचे शिक्षण हे कृतीशिस्त पद्धतीवर आधारित आहे. विद्यार्थ्यात वेगवेगळ्या क्षमता असतात. त्यांना जवबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थी प्रक्रियेत सहभागी होईल. कृतियुक्त शिकण्याची सवय विद्यार्थ्यांना लावली जावी. त्यानंतर अपासुकच पारंपारिक पद्धतीचे शिक्षण मागे पडेल. विद्यार्थ्यांना नवी दिशा व उर्जा देण्यासाठी जलद गतीचे शिक्षण असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभयसिंह परिहार यांनी केले.लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे ९ वी व १० वीच्या शिक्षकांचे जलद गतीने शिक्षण याचे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करताना प्राचार्य अभयसिंह परिहार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे, उपशिक्षणाधिकारी मोहन चोले, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड, तज्ज्ञ प्रशिक्षक कैलास कुरंजेकर, घनशाम तरोणे, कांचन थानथराटे, केशर बोकडे यांची उपस्थिती होती.शिक्षकांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ विस्तार अधिकारी शंकर राठोड म्हणाले, सराव पाठांतराने विद्यार्थ्यांची प्रगतीस बाधा येते. रंजक पद्धतीने स्वयंअध्ययन झाले पाहिजे. संबोध कायमस्वरूपी लक्षात राहतात. शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची आहे. विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व, उपलब्ध भौतिक सुविधा आणि शिक्षकांची कल्पकता यावर जलद प्रगत शिक्षण यावर टिकणार आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी मोहन चोले यांनी, विद्यार्थ्यांशी अत्यंत आत्मविश्वासाने वागा, असा सल्ला दिला.प्रशिक्षणात गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय, उपचारात्मक व एएलपी यातील फरक, रचनावाद, पुरक हेतू आदी बाबींचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. यात ५० शिक्षक प्रशिक्षणार्थी शिक्षकांची उपस्थिती होती. कारधा, दवडीपार, पहेला, मानेगाव, कोथूर्णा या केंद्राचे शिक्षक उपस्थित होते. तज्ज्ञ शिक्षक कैलाश कुरंजेकर, घनश्याम तरोणे, केशर बोकडे, कांचन थानथराटे यांनी प्रशिक्षण दिले. स्रेहल खानपुरकर, राऊत, दहिवले, खापर्डे यांनी प्रशिक्षण यशस्वी करण्यास मदत केली.
सकारात्मक उर्जेसाठी जलद गतीचे शिक्षण
By admin | Published: June 21, 2017 12:36 AM