लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बुज.) : येथील पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंप धारकांना मिळालेले अभय, यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना दिवसातून केवळ एकदाच अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भर उन्हा-तान्हात पायपीट करावी लागत आहे.विरलीकरांची तहान भागविण्यासाठी ईटान येथील वैनगंगा नदीवर ६६ लाख रुपयांची वाढीव पाणीपुरवठा योजना २०१६ पासून कार्यान्वीत करण्यात आली. मात्र या महत्वाकांक्षी योजनेला सध्या ग्रहन लागले असून ही योजना गावकºयांची लहान गावकºयांना दिवसातून केवळ एकदाच अपूरा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी गावकºयांना आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. विशेषत: पशुपालकांना जनावरांची तहान भागविण्यासाठी गावालगतच्या शेतातून बैलबंडी अथवा ढकल गाडीने पाणी आणावे लागत आहे.सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सुमारे ४५० खाजगी नळजोडण्या असून पाच सार्वजनिक नळ कोंडाळे आहेत. पाणीपुरवठ्यासाठी ३५ हातपंप असून त्यापैकी १० कार्यरत आहेत. मात्र एवढ्या पाणीपुरवठ्याच्या सोयी असूनही सदोष पाणीपुरवठा प्रणाली, टिल्लूपंप धारकांना स्थानिक प्रशासनाकडून मिळणारे अभय आणि पाण्याच्या अपव्ययांमुळे विरलीकरांना पुरेसा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाली आहे.विरली ग्रामपंचायतच्या वतीने सन २०१८ हे ग्राम जलवर्ष म्हणून साजरे केले जात असून त्यानिमित्त पाणी माझे जीवन अभियान मोठा गाजावाजा करून राबविण्याचा संकल्प करण्यात आला. यासाठी गावात घरोघरी दिनदर्शिकेच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार करण्यात आला. मात्र या अभियानानिमित्त राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात उतरविण्यात ग्राम प्रशासनाला अपयश आले. परिणामी जलवर्षातच गावकºयांवर जलसंकटाचा सामना करण्याची नामुस्की ओढवली.गावात सध्यास्थितीत शंभराहून अधिक टिल्लूपंपधारक कार्यरत असून त्यांच्यावर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. मात्र यासंबंधी ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली असता तुमच्या नळाला पाणी येत नसेल तर नळजोडणी बंद करून घ्या, अशी तक्रारकर्त्यांची बोळवण करून टिल्लूपंप धारकांना पाठीशी घातले जात आहे. सध्या काही लोकांचे घराचे बांधकामे सुरू असून पिण्याची पाणी टिल्लुपंपाने खेचून त्याचा उपयोग बांधकामासाठी केला जात आहे.पाच लाखांच्या योजनेने ८ वर्षे तहान भागविलीयापूर्वी सन २००८ ते २०१६ पर्यंत येथील शिवकालीन पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीमधून सुरळीत पाणीपुरवठा होवून गावकºयांची तृष्णा शमविली जात होती. मात्र वैनगंगेवरील वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू होऊन दोन वर्ष लोटत नाही तोच या योजनेला वारंवार काहींना काही ग्रहण लागत असून ही पाणीपुरवठा योजना गावकºयांची तहान भागविण्यास असमर्थ ठरली आहे.गावकºयांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी गावातील नादुरूस्त हातपंपाच्या दुरूस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यातून पशुपालकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.-लोकेश भेंडारकर, सरपंच ग्रामपंचायत विरली
विरलीत कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 10:42 PM
येथील पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंप धारकांना मिळालेले अभय, यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट : महिन्याभरापासून दिवसातून एकदाच पाणीपुरवठा, ग्रामप्रशासन टिल्लूपंप धारकांच्या पाठीशी