आंदोलनाचे नेतृत्व सरपंच प्रल्हाद आगाशे, माजी सभापती कलाम शेख, पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, उपसरपंच शरद आतीलकर, अभय मिश्रा, गणेश सिंदपुरे, प्रवीण मिश्रा, बालकदास ठवकर, नारायण सिंदपुरे, प्रफुल वराडे यांनी केले. यावेळी तहसीलदार बाळासाहेब तेळे, उपविभागीय अभियंता विनोद चुरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे उपस्थित होते. संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी कारकापूर ते शिलेगाव रस्ता एक महिन्यात मंजूर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलकांनी दिलेल्या वेळेत रस्ता बांधकाम न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला.
यावेळी रामेश्वर मोटघरे, अविनाश सिंदपुरे, मुकुंदा आगाशे, राजू आगाशे, श्रावण माहुले, युगल आगाशे, अंकित आथीलकर, रवींद्र सिंदपुरे, विनोद आगाशे, अमित बुद्धे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.