आंदोलनस्थळी पवनी तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस, सेवादल, कामगार सेल, अल्पसंख्याक सेल, अनुसूचित जाती तसेच सर्व सेल आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले आहे.
आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना दिलेले आहे. त्यातील प्रमुख मागण्यांत नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी खड्डे, भेगा पडलेल्या आहेत म्हणून गुणवत्तेची चौकशी करण्यात यावी. महामार्गाची उंची वाढत असल्यामुळे शेतातील पारंपरिक रस्ते बंद झालेत. त्यांना लवकरात लवकर रस्ते तयार करून देण्यात यावेत. महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका झाला त्याची चौकशी करून संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जावा. महामार्गाची कामे करण्यासाठी गौण खनिज तलावातील आणि इतर भागाचे नुकसान करून शासनाचा महसूल बुडवल्याची शंका आहे त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आहे.